AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tusshar Kapoor Net Worth : करोडोंच्या संपत्तीचा मालक तुषार कपूर, ऑडी-बीएमडब्ल्यू सारख्या वाहनांचाही शौकीन!

तुषार कपूर (Tusshar Kapoor) हा एक बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आहे. त्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, तसेच अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘गोलमाल’ फ्रँचायझीमध्ये साकारलेली तुषार कपूरची भूमिका सर्वांना हसवते.

Tusshar Kapoor Net Worth : करोडोंच्या संपत्तीचा मालक तुषार कपूर, ऑडी-बीएमडब्ल्यू सारख्या वाहनांचाही शौकीन!
Tusshar Kapoor
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 12:34 PM
Share

मुंबई : तुषार कपूर (Tusshar Kapoor) हा एक बॉलिवूड अभिनेता आणि निर्माता आहे. त्याने अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये काम केले आहे, तसेच अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. ‘गोलमाल’ फ्रँचायझीमध्ये साकारलेली तुषार कपूरची भूमिका सर्वांना हसवते. तुषार चित्रपट कुटुंबातील असेल, पण त्याने आपल्या कमाईने करोडोंची संपत्ती निर्माण केली आहे. त्यांनी स्वत:च्या पैशातून ऑडी, बीएमडब्ल्यू सारखी वाहने खरेदी केली आहेत. जाणून घेऊया तुषार कपूरची संपत्ती किती आहे?

तुषार कपूरचा जन्म मुंबईतच झाला होता. तो ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र आणि शोभा कपूर यांचा मुलगा आहे. लहानपणापासूनच तो फिल्मी वातावरणात वाढला आहे. त्याच्या बहिणीचे नाव एकता कपूर आहे. एकता कपूर ही सिनेमा आणि टेलिव्हिजनच्या सर्वात यशस्वी निर्मात्यांपैकी एक आहे. त्याने एकट्याने स्वतःच्या हिंमतीवर एक मोठे प्रोडक्शन हाऊस बनवले आहे. तुषार कपूर त्याच्या पावलावर पाऊल ठेवत आहे. अनेक चित्रपटांमध्ये अभिनयासोबतच तुषारने अनेक चित्रपटांच्या निर्मितीचाही भाग घेतला आहे. त्याची अनेक पात्रे लोकांना आजही आवडतात.

तुषार कपूरची एकूण संपत्ती

तुषारची एकूण संपत्ती 37 कोटी इतकी आहे. 2021 मध्ये त्यांची एकूण संपत्ती 5 दशलक्ष इतकी होती. त्याचे मासिक उत्पन्न किंवा पगार याबद्दल बोलायचे, तर तो चित्रपट किंवा जाहिरातींमधून जवळपास 40 लाख रुपये कमावतो. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 5 कोटी आहे. caknowledge नावाच्या वेबसाईटनुसार त्याच्या उत्पन्नाचा हा आकडा सांगण्यात आला आहे. ऑक्टोबर 2021 पर्यंतचा हा अहवाल आहे.

महागड्या वाहनांचे कलेक्शन

यासोबतच तुषारकडे अनेक महागडी वाहने आहेत. ही सर्व वाहने तुषारने स्वःकमाईने खरेदी केली आहेत. यामध्ये त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे योगदान नाही. तुषारकडे Porsche Cayenne, Audi Q7 आणि BMW 7 सारख्या महागड्या गाड्या आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबातून असूनही तुषारने आपल्या कामाने स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे.

तुषार कपूरने 2001 मध्ये आलेल्या तुझे मेरी कसम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्याने अनेक विनोदी चित्रपटांमध्ये काम केले आणि त्याच्या कॉमिक टायमिंगचेही खूप कौतुक झाले. ‘क्या कूल है हम’ आणि ‘गोलमाल’ यांसारख्या फ्रँचायझींचा तो महत्त्वाचा भाग आहे आणि त्याची भूमिका प्रेक्षकांनाही आवडली आहे.

हेही वाचा :

Manisha Kelkar | अभिनेत्रीच नव्हे तर, फॉर्म्युला फोर कार रेसरही, अपघातावर मात करत केलं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन!

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: कतरिना-विकी करणार लग्नाची घोषणा, लवकरच मिळणार लग्नाचं आमंत्रण!

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.