AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: कतरिना-विकी करणार लग्नाची घोषणा, लवकरच मिळणार लग्नाचं आमंत्रण!

सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचे लग्न. डिसेंबरमध्ये दोघंही जोधपूरच्या आलिशान किल्ल्यात सात फेरे घेणार असल्याचं वृत्त आहे. त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding: कतरिना-विकी करणार लग्नाची घोषणा, लवकरच मिळणार लग्नाचं आमंत्रण!
Vicky Katrina
| Edited By: | Updated on: Nov 20, 2021 | 11:12 AM
Share

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय आहे तो म्हणजे कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि विकी कौशल (Vicky Kaushal) यांचे लग्न. डिसेंबरमध्ये दोघंही जोधपूरच्या आलिशान किल्ल्यात सात फेरे घेणार असल्याचं वृत्त आहे. त्यांच्या लग्नाच्या अधिकृत घोषणेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. हे जोडपे लवकरच लग्नाचे वृत्त जगासमोर ठेवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, कतरिना आणि विकी लवकरच त्यांच्या लग्नाची औपचारिक घोषणा करणार आहेत. केवळ या जोडप्याच्या लग्नाची तारीखच नाही, तर प्रत्येक तपशील जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

गाड्यांचे केले जातेय आगाऊ बुकिंग!

कतरिना आणि विकी जोधपूरमधील सिक्स सेन्सेस बरवारा फोर्टमध्ये आपला ‘बेस्ट डे’ सेलिब्रेट करणार असल्याचे सांगण्यात येत येत आहे. इथेच ते लग्न करणार आणि इथूनच कतरिनाची पाठवणी होणार आहे. लग्नसमारंभासाठी आगाऊ वाहनेही बुक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यांनी त्यांच्या पाहुण्यांसाठी सर्व प्रकारच्या सुविधांची व्यवस्था केली आहे.

कतरिनाचीही लगीन घाई!

अभिनेत्री कतरिना कैफनेही तिच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. अभिनेत्री तिच्या खास मित्राच्या घरी लग्नाचे आउटफिट ट्रायल आणि सिलेक्शन करत असल्याचे वृत्त आहे. तर, दुसरीकडे या जोडप्याच्या टीमने लग्नाची तयारी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यात 10 जणांची टीम राजस्थानला पाहणी करण्यासाठी गेली होती.

प्रत्येक सोहळ्यासाठी खास टीम

मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हॉटेल्स 7-12 डिसेंबरसाठी आरक्षित आहे आणि अनेक कार्यक्रम हाताळण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांना टीम तयार करण्यास सांगितले आहे. एका अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले की, ‘विवाह सोहळ्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांना नियुक्त केले जात आहे.’

सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये आयोजीत होणार भव्य सोहळा

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ‘सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा’ हा 14 व्या शतकातील किल्ला आहे, जो सिक्स सेन्स सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे.

कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा असलेला किल्ला नक्कीच एका भव्य राजवाड्याची अनुभूती देतो. यामध्ये प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ आणि आंतरराष्ट्रीय क्युझिन, तसेच कॉकटेल आणि व्हिस्कीची सेवा देणारी तीन रेस्टॉरंट्स आहेत. किल्ल्यामध्ये एक स्पा देखील आहे, जो राणी पॅलेस आणि आजूबाजूच्या मंदिरांच्या मधोमध वसलेला आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवाराचे सेंट्रल प्रांगण पारंपारिक बागेत रूपांतरित केले गेले आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत.

विकी-कतरिना कामात व्यस्त!

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कतरिना अलीकडेच सुपरहिट ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती. दुसरीकडे, विकी कौशल ‘सरदार उधम’मध्ये दिसला होता आणि या दोघांचेही बरेच चित्रपट रांगेत आहेत. विकीने ‘सरदार उधम’ चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळवली आहे.

हेही वाचा :

Urfi Javed | ही मुलगी काही ऐकतच नाही…उर्फी जावेदच्या नव्या बोल्ड फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा!

Happy Birthday Tusshar Kapoor | बिन लग्नाचा पिता बनून सर्वांनाच दिला आश्चर्याचा धक्का, वाचा अभिनेता तुषार कपूरबद्दल…

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.