Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | लग्नाच्या तयारीची सुरुवात, विकी-कतरिना चिडीचूप मात्र टीम राजस्थानला रवाना!

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या अफवा अनेक महिन्यांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पसरत होत्या, त्या हळूहळू दूर होत आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिझी शेड्यूलमुळे विकी आणि कतरिना या वर्षी भारतातच लग्न करणार आहेत.

Katrina Kaif-Vicky Kaushal Wedding | लग्नाच्या तयारीची सुरुवात, विकी-कतरिना चिडीचूप मात्र टीम राजस्थानला रवाना!
Vicky Katrina
Follow us
| Updated on: Nov 13, 2021 | 1:29 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) यांच्या लग्नाच्या अफवा अनेक महिन्यांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पसरत होत्या, त्या हळूहळू दूर होत आहेत. रिपोर्ट्सनुसार, बिझी शेड्यूलमुळे विकी आणि कतरिना या वर्षी भारतातच लग्न करणार आहेत. गुपचूप साखरपुडा केल्यानंतर आता ते लग्नाच्या तयारीत आहेत. दोघांनी लग्नासाठी सिक्स सेन्स फोर्ट हॉटेल निवडले असल्याचे सांगितले जात आहे.

आयएएनएसने दिलेल्या वृत्तानुसार, विकी आणि कतरिनाची 10 सदस्यीय टीम मंगळवारी राजस्थानमधील सवाई माधोपूर जिल्ह्यातील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये हॉटेलची व्यवस्था पाहण्यासाठी पोहोचली आहे. वराचा प्रवेश, मेहेंदी कार्यक्रमाची व्यवस्था यावर ही टीम निर्णय घेणार आहे.

प्रत्येक सोहळ्यासाठी खास टीम

मीडिया रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, हॉटेल्स 7-12 डिसेंबरसाठी आरक्षित आहे आणि अनेक कार्यक्रम हाताळण्यासाठी त्यांनी अनेक कंपन्यांना टीम तयार करण्यास सांगितले आहे. एका अधिकाऱ्याने एजन्सीला सांगितले की, ‘विवाह सोहळ्यातील वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी वेगवेगळ्या कंपन्यांना नियुक्त केले जात आहे.’

विकी आणि कतरिनाने अद्याप लग्नाबाबत मौन सोडलेले नाही. मीडियासमोरही ते लग्नाचे प्रश्न टाळत आहेत.  विकीच्या एका मित्राने सांगितले की, दोघेही सध्या कोणाचा सध्या कोणाचा फोनही उचलत नाहीत. कतरिनाच्या एका जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, मीडियामध्ये लग्नाच्या अफवांमुळे कतरिना खूप वैतागली आहे, त्यामुळे दोघेही मीडियापासून अंतर राखताना दिसत होते. अलीकडेच विकी आणि सारा अली खानला एकत्र स्पॉट करण्यात आले होते. जिथे, एका रिपोर्टरने विकीला लग्नाबद्दल विचारले, सारा अली खान हसली पण विकीने ऐकूनही प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

सिक्स सेन्सेस फोर्टमध्ये आयोजीत होणार भव्य सोहळा

रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, कतरिना आणि विकीचे लग्न डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. ‘सिक्स सेन्सेस फोर्ट बरवारा’ हा 14 व्या शतकातील किल्ला आहे, जो सिक्स सेन्स सेंच्युरी आणि वेलनेस स्पा मध्ये रूपांतरित करण्यात आला आहे.

कतरिना आणि विकीच्या लग्नाची चर्चा असलेला किल्ला नक्कीच एका भव्य राजवाड्याची अनुभूती देतो. यामध्ये प्रसिद्ध स्थानिक खाद्यपदार्थ आणि आंतरराष्ट्रीय क्युझिन, तसेच कॉकटेल आणि व्हिस्कीची सेवा देणारी तीन रेस्टॉरंट्स आहेत. किल्ल्यामध्ये एक स्पा देखील आहे, जो राणी पॅलेस आणि आजूबाजूच्या मंदिरांच्या मधोमध वसलेला आहे. सिक्स सेन्स फोर्ट बरवाराचे सेंट्रल प्रांगण पारंपारिक बागेत रूपांतरित केले गेले आहे, ज्यामध्ये अनेक प्रकारची झाडे आणि रोपे लावण्यात आली आहेत.

विकी-कतरिना कामात व्यस्त!

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कतरिना अलीकडेच सुपरहिट ‘सूर्यवंशी’मध्ये अक्षय कुमारसोबत झळकली होती. दुसरीकडे, विकी कौशल ‘सरदार उधम’मध्ये दिसला होता आणि या दोघांचेही बरेच चित्रपट रांगेत आहेत. विकीने ‘सरदार उधम’ चित्रपटातील त्याच्या अभिनयासाठी खूप प्रशंसा मिळवली आहे.

हेही वाचा :

बोनी कपूरला दुबई सरकारकडून वाढदिवसाची खास भेट, कपूर परिवाराला दुबईचा ‘गोल्डन व्हिसा’!

‘आला आला आला आला खुर्चीचा राजा आला..’, सत्तेच्या ‘खुर्ची’त विराजमान होणार चिमुकला अभिनेता!

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.