‘किसान’ चित्रपटात झळकणार अभिनेता सोनू सूद, बिग बी यांच्या खास शुभेच्छा!

'किसान' चित्रपटात झळकणार अभिनेता सोनू सूद, बिग बी यांच्या खास शुभेच्छा!

बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोमवारी अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) ‘किसान’ (Kisaan) चित्रपटाची घोषणा केली.

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jan 04, 2021 | 6:20 PM

मुंबई : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी सोमवारी अभिनेता सोनू सूदच्या (Sonu Sood) ‘किसान’ (Kisaan) चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाचे दिग्दर्शन ई निवास हे करत आहेत. आयुष्मान खुराना यांच्या 2019 च्या कॉमेडी फिल्म “ड्रीम गर्ल” या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण करणारे राज शांडिल्य ‘किसान’ चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. ई निवास दिग्दर्शित आणि सोनू सूदच्या किसान चित्रपटाला अमिताभ बच्चन यांनी ट्विटकरून शुभेच्छा दिल्या आहेत. चित्रपट समीक्षक तरण आदर्शने सोनू सूद यांच्या नवीन चित्रपटाशी संबंधित एक फोटोही शेअर केला आहे. (Actor Sonu Sood will be seen in the movie Kisaan)

केबीसीच्या सेटवर सोनू सूद यांचे ‘आई एम नो मसीहा’ (I Am No Messiah) या पुस्तकही प्रदर्शित करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसच्या काळात जगभरातील सर्वच लोक चिंताग्रस्त होते. त्या काळात लोकांना अनेक समस्यांना सोमोरे जाण्याची वेळ आली होती. बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या होत्या, काही जणांवर तर उपाशी राहण्याची वेळ देखील आली होती. आपल्या कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हजारो किलो मीटर दुर राहणाऱ्या लोकांना तर घरी कुटुबियांकडे जाण्यासाठी पैसे आणि कुठलेही साधन नव्हते. अशावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद रस्तावर उतरून लोकांची मदत करत होता.

त्याच्या या सर्व कार्यासाठी तेलंगणातील सिद्दीपेट जिल्हातील डब्बा टांडागावातील लोकांनी सोनू सूदला समर्पित मंदिर बांधले आहे. या मंदिराचे ग्रामस्थांनी उद्घाटन केले. यावेळी सोनू सूदची आरती देखील करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेषभूषा करून गाणे देखील म्हणले. जिल्हा परिषद सदस्य गिरी कोंडल रेड्डी म्हणाले की, कोरोनो व्हायरसच्या काळात सोनू सूदने जनतेसाठी मोठे काम केले.

संबंधित बातम्या : 

नवाजुद्दीन AK Vs Ak वर खूश, अनिल कपूरने घेतली शाळा, म्हणतो, ‘तू पण या चित्रपटामध्ये आहेस विसरु नको!’

Farmers’ Protest | ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा शेतकऱ्यांना ‘ओपन सपोर्ट’, म्हणाले, ‘माझ्या बळीराजाला न्याय मिळायलाच पाहिजे’…

(Actor Sonu Sood will be seen in the movie Kisaan)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें