AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Breakup Story | विक्की कौशलशी ब्रेकअपनंतर पूर्णपणे खचून गेलेली हरलीन सेठी, वाचा बॉलिवूडची चर्चित ब्रेकअप स्टोरी

त्येक प्रेमकथा पूर्ण होईलच असे नाही. सुपरस्टार्स विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि हरलीन सेठी (Harleen Sethi) यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. विक्की सद्यघडीला आपल्या अभिनयाच्या बळावर प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो. पण एक काळ असा होता की लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विक्कीच्या मनावर हरलीन सेठी राज्य करायची.

Breakup Story | विक्की कौशलशी ब्रेकअपनंतर पूर्णपणे खचून गेलेली हरलीन सेठी, वाचा बॉलिवूडची चर्चित ब्रेकअप स्टोरी
विक्की-हरलीन
| Edited By: | Updated on: Jun 18, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : प्रत्येक प्रेमकथा पूर्ण होईलच असे नाही. सुपरस्टार्स विक्की कौशल (Vicky Kaushal) आणि हरलीन सेठी (Harleen Sethi) यांच्या बाबतीतही असेच काहीसे घडले. विक्की सद्यघडीला आपल्या अभिनयाच्या बळावर प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो. पण एक काळ असा होता की लाखो लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या विक्कीच्या मनावर हरलीन सेठी राज्य करायची (Actor Vicky Kaushal And Harleen Sethi breakup story).

हरलीन सेठी एक पंजाबी स्टार आहे. तसेच, तिने बर्‍याच जाहिराती आणि वेबसीरीजमध्ये देखील काम केले आहे. हरलीन आणि विक्की दोघांनीही आपले प्रेम उघडपणे स्वीकारले होते. तथापि, जेव्हा या दोघांचे नाते ब्रेक झाले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. दोघांच्या ब्रेकअपवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता.

जाहीरपणे स्वीकारले प्रेम

विक्की कौशलने हरलीन सेठीशी आपले नाते सुरुवातीपासूनच जाहीररित्या मान्य केले होते. विक्की जो बर्‍याच मुलींसाठी स्वप्नातला राजकुमार होता, त्याने हरलीनबरोबरचे नाते जाहीर केल्यामुळे अनेक तरुणींची हृदय तुटली होती. एकदा कॉफी विथ करणमध्ये विक्कीने नाव न घेता आपण एका सुंदर मुलीला डेट करत असल्याचे म्हटले होते.

कशी सुरू झाली लव्हस्टोरी?

विक्की आणि हरलीनची पहिली भेट एका पार्टीत झाली होती. या दोघांची प्रेमकथा या पार्टीतूनच सुरू झाली. विक्कीने स्वत:हून सांगितले होते की, जेव्हा त्याने हरलीनला पहिल्यांदा पार्टीत पाहिले तेव्हा त्याची नजर तिच्यावरच खिळली होती. अभिनेत्याने असेही म्हटले होते की, जेव्हा तो हरलीनबरोबर असतो तेव्हा तो आपला वेळ खूपच एन्जॉय करतो.

2019 मध्ये ब्रेकअप

मीडिया रिपोर्टनुसार, हरलीन सेठी आणि विक्की कौशल यांचा ब्रेकअप 2019च्या आसपास झाला. त्यांचा ब्रेकअप का झाला, हे या दोघांनी कधीही उघडपणे सांगितले नाही. पण एकदा हरलीन म्हणाली की, मला ब्रेकअप झाल्याने अजिबात त्रास होत नाही. मी एका चित्रपटाच्या अभिनेत्याशी नात्यात होते आणि मी अद्याप एकाही चित्रपटात अभिनय केलेला नाही.

ब्रेकअप का झाला?

जेव्हा हरलीनने अचानक विक्कीला तिच्या इंस्टाग्रामवरुन अनफॉलो केले, तेव्हा या दोघांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले. हा तो काळ होता जेव्हा विक्की कौशल आणि कतरिना कैफच्या जवळीकीबद्दल चर्चा सुरु झाली होती. असे म्हणतात की, कतरिना आल्यानंतरच हरलीनने विक्कीपासून स्वत:ला दूर केले. माध्यमांच्या वृत्तानुसार, जेव्हा दोघांच्या नात्यामध्ये समस्या येऊ लागल्या, तेव्हा विक्की आणि हरलीन या दोघांनीही एकमेकांसोबतचे नाते टिकवण्याचा प्रयत्न केला होता, पण या दोघांमध्ये काहीही पूर्ववत झाले नाही.

नैराश्यात गेली हरलीन

पिंकविलाच्या वृत्तानुसार, विक्कीशी ब्रेकअपनंतर हरलीन सेठी नैराश्यात गेली होती. ब्रेकअपमुळे हरलीन खूप नाराज झाली होती आणि त्याचा तिच्यावर खूप खोलवर परिणाम झाला होता. पिंकविलाच्या म्हणण्यानुसार, दोघांनी विभक्त होण्यापूर्वी चर्चा केली होती आणि एकमेकांना समजावून सांगितले की, त्यांना सर्व नकारात्मक गोष्टींपासून दूर रहावे लागेल. तथापि, अद्यापही काहीही ठीक झालेले नाही.

विक्की कौशल सध्या कतरिना कैफला डेट करत आहे. अभिनेता हर्षवर्धनने दोघांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले आहे. हरलीन अजूनही अविवाहित आहे.

(Actor Vicky Kaushal And Harleen Sethi breakup story)

हेही वाचा :

Video | ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, ‘कोव्हिशिल्ड’ घेताना राखीने केलं नव्या गाण्याचं प्रमोशन, पाहा व्हिडीओ

Samantar 2 | दोन काळ, दोन व्यक्ती, आणि एक रहस्य! काय घडणार कुमारच्या आयुष्यात? पाहा ‘समांतर 2’चा जबरदस्त टीझर

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.