Deepika padukone | दीपिका पदुकोणची पुन्हा हॉलिवूडकडे धाव, नव्या चित्रपटातून पुन्हा करणार धमाल!

‘एक्सएक्सएक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज’ नंतर, आता अभिनेत्रीला आणखी एक हॉलिवूड चित्रपट मिळाला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा ‘XXX: रिटर्न ऑफ झेंडर केज’ 2017 मध्ये रिलीज झाला होता. दीपिकाचे या चित्रपटातील काम तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडले होते.

Deepika padukone | दीपिका पदुकोणची पुन्हा हॉलिवूडकडे धाव, नव्या चित्रपटातून पुन्हा करणार धमाल!
Deepika Padukone

मुंबई : बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) बऱ्याच काळापासून पडद्यावर धमाल करत आहे. दीपिकाच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक चित्रपट प्रचंड आवडतो. दीपिकाला बॉलिवूडमध्येच नाही, तर हॉलीवूडमध्येही तिने आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. आता दीपिकाच्या हातात आणखी एक हॉलिवूड चित्रपट आला आहे.

होय, बातमीनुसार, ‘एक्सएक्सएक्स: रिटर्न ऑफ झेंडर केज’ नंतर, आता अभिनेत्रीला आणखी एक हॉलिवूड चित्रपट मिळाला आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचा ‘XXX: रिटर्न ऑफ झेंडर केज’ 2017 मध्ये रिलीज झाला होता. दीपिकाचे या चित्रपटातील काम तिच्या चाहत्यांना चांगलेच आवडले होते.

दीपिका पुन्हा हॉलिवूडमध्ये दाखवणार जलवा

Pinkvilla च्या बातमीनुसार, दीपिका पदुकोण आणखी एका हॉलिवूड चित्रपटात काम करण्यास तयार आहे. मात्र, या चित्रपटाचे नाव काय असेल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण, या क्रॉस कल्चर रोमँटिक कॉमेडीची निर्मिती STXfilms करत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, दीपिका या चित्रपटात केवळ अभिनय करणार नाही, तर ती तिच्या बॅनर प्रोडक्शन्सद्वारे याची निर्मिती देखील करणार आहे.

आता हा चित्रपट कधी सुरू होतो, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण स्वतः याची पुष्टी करेल याची चाहते अजूनही वाट पाहत आहेत. पण ज्या क्षणी ही बातमी समोर आली आहे, त्याच क्षणी चाहत्यांमध्ये नक्कीच आनंदाची लाट उसळली आहे. चाहत्यांना दीपिकाला हॉलिवूड चित्रपटांमध्ये पाहायला आवडते. आता हे पाहावे लागेल की, अभिनेत्रीचा हा चित्रपट किती काळात प्रेक्षकांच्या भेटीला येतो.

बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावले!

दीपिका पदुकोणने आपल्या करिअरची सुरुवात ‘ओम शांती ओम’ या चित्रपटातून केली होती. या चित्रपटात शाहरुख खान अभिनेत्रीच्या सोबत दिसला होता. या चित्रपटानंतर दीपिकाने तिच्या कारकिर्दीत मागे वळून पाहिले नाही. 2012 चा चित्रपट ‘कॉकटेल’ हा अभिनेत्रीच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट म्हणता येईल. यानंतर, अभिनेत्रीने तिचा अभिनय अनेक चित्रपटात चाहत्यांसमोर सादर केला. आता लवकरच दीपिका शकुन बत्राच्या पुढील चित्रपटात अनन्या पांडे आणि सिद्धांत चतुर्वेदीसोबत स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहे.

याशिवाय तिचा ‘83’ हा चित्रपटही प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटात ती लग्नानंतर पहिल्यांदा पती रणवीर सिंहसोबत काम करताना दिसणार आहे. कोरोनाच्या कहरामुळे हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी बऱ्याच काळापासून वाट पाहत आहे.

(Actress Deepika Padukone signs her second Hollywood movie)

हेही वाचा :

‘ती पाहताच बाला कलिजा खलास झाला…’, रसिका सुनीलच्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव!

Aai Kuthe Kay Karte | प्रेक्षकांचं मनोरंजन, कथानकाची उत्सुकता, ‘आई कुठे काय करते’ नॉनस्टॉप अर्धा तास प्रेक्षकांच्या भेटीला!

अनिरुद्धशी लग्न संजानाशी पण गृहप्रवेश मात्र अरुंधतीचा, पाहा ‘आई कुठे काय करते’मध्ये पुढे काय घडणार…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI