Aai Kuthe Kay Karte | प्रेक्षकांचं मनोरंजन, कथानकाची उत्सुकता, ‘आई कुठे काय करते’ नॉनस्टॉप अर्धा तास प्रेक्षकांच्या भेटीला!

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे.

Aai Kuthe Kay Karte | प्रेक्षकांचं मनोरंजन, कथानकाची उत्सुकता, ‘आई कुठे काय करते’ नॉनस्टॉप अर्धा तास प्रेक्षकांच्या भेटीला!
आई कुठे काय करते

मुंबई : छोट्या पडद्यावरील बहुचर्चित आणि लोकप्रिय मालिका म्हणजे स्टार प्रवाह वरील ‘आई कुठे काय करते’(Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने घराघरांत आणि प्रेक्षकांच्या मनामनात स्थान मिळवले आहे. या वेळी ही मालिका टीआरपी शर्यतीतही अव्वल क्रमांकावर आहे. सध्या मालिकेत अनेक नवी वळणे येत असून, मालिका अतिशय मनोरंजक झाली आहे. प्रेक्षकांची उत्सुकता देखील वाढली आहे. प्रेक्षकांची हीच उत्सुकता लक्षात घेता नुकताच मालिकेचा एक खास भाग प्रदर्शित करण्यात आला, जो विना ब्रेक प्रसारित करण्यात आला.

साधारण डेली सोपच्या रोज प्रसारित होणाऱ्या अर्धा तास अर्थात 30 मिनिटांच्या भागात साधारणत: 22 मिनिटांची कथा आणि 8 मिनिटांचा वेळ हा ब्रेक-जाहिराती यांसाठी दिला जातो. मात्र, यावेळी प्रेक्षकांची उत्सुकता पाहून नुकतच प्रदर्शित झालेला भाग हा विना ब्रेक सलग 30 मिनिटे दाखवला गेला.

मालिकेत सध्या काय सुरुये?

मालिकेत सध्या अनिरुद्ध देशमुख आणि संजना याच्या लग्नाचा ट्रॅक सुरु आहे. मात्र आता या महत्वाच्या मुहूर्तावर देखील एक नवा हंगामा दिसणार आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत आता अनिरुद्ध आणि अरुंधतीचा घटस्फोट झाला आहे. या नंतर आता संजनाने देखील शेखरपासून घटस्फोट मिळवला आहे. यानंतर ती घाईनेच अनिरुद्धसोबत लग्नाच्या मागे लागली.

संजनाचा जळफळाट

अरुंधती पुन्हा समृद्धी बंगल्यात आलीये हे ऐकून संजना प्रचंड संतापली आहे. या दरम्यान तिने अनिरुद्धचा भाऊ अविनाश याच्यावर देखील घर हडपण्यासाठी आलायस असे आरोप केले. तर दुसरीकडे तिचा देखील घटस्फोट झाल्याने आता संजना लग्नासाठी अनिरुद्धशी लग्नाची तयारी करत आहे. त्यातच अरुंधती घरी आली आणि घटस्फोटानंतरही अनिरुद्धचा तिच्याकडे वाढता झुकाव बघता संजनाला खूप असुरक्षित वाटू लागलं आहे. त्यामुळे आजारी अरुंधती घरी आल्यावर संजनाने लगेचच लग्नाचा घाट घातला आहे. मात्र, लग्न करायचे नाही म्हणून अनिरुद्धने पुन्हा एकदा पाल काढला आहे.

अरुंधतीच्या दबावामुळे अनिरुद्धला करावे लागले लग्न!

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये अनिरुद्ध घरी परत आल्याचे दिसत आहे. मात्र, तो लग्नासाठी तयार नसल्याचे देखील कळते आहे. तर, याच वेळी संजना त्याला आता मागे फिरलास तर पोलिसांत तक्रार दाखल करेन, असे म्हणत धमकी देते. तर, आपल्या कुटुंबावर कोणताही कारवाईचा बडगा येऊ नये म्हणून अरुंधती देखील अनिरुध्वर लग्नासाठी दवब टाकते. तुम्हाला हे लग्न करावेच लागेल आता माघार घेता येणार नाही, असे तिने अनिरुद्धला ठणकावून सांगितले आहे. यानंतर दोघेही लग्न करताना दिसत आहेत.

लग्न तर पार पडलं, पण गृहप्रवेश…

अरुंधतीच्या दबावानंतर अनिरुद्धने संजनाशी लग्न केलं. घरच्यांचा या सगळ्याला विरोध असतानाही हे लग्न आता पार पडले आहे. आता संजना देशमुख कुटुंबात गृह्प्रवेशाची तयारी करत आहे. दोघांची वरात देशमुखांच्या समृद्धी बंगल्यात आली आहे. संजना माप ओलांडणार इतक्यात अनिरुद्धची आई या दोघांना गरात येण्यापासून रोखते. याचवेळी झालेल्या तु-तु-मै-मै दरम्यान आईंना चक्कर येते. इतक्यात अनिरुद्ध गळ्यातील हार काढून आईकडे धाव घेतो. इतक्यात बाहेर उभी असलेली अरुंधतीदेखील धावत आत येते आणि तिच्या पायाने ते माप ओलांडले जाते. यामुळेच आता लग्न जरी संजनाचं झालं असलं तरी, गृहप्रवेश मात्र पुन्हा अरुंधतीचाच झाला आहे.

हेही वाचा :

सिद्धार्थ मल्होत्रानं म्हणतो, अभिनेता नसतो तर सैनिक झालो असतो!

‘शेवटी समर सारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच…’, ‘पाहिले न मी तुला!’ बद्दल शशांक केतकरनं व्यक्त केल्या भावना

इंटिमेट सीन देताना जॅकी श्रॉफला अवघडल्यासारखं का होतं?, म्हणाले- बरेच लोक तुम्हाला बघत असतात!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI