‘शेवटी समर सारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच…’, ‘पाहिले न मी तुला!’ बद्दल शशांक केतकरनं व्यक्त केल्या भावना

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेसोबत शशांकच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. याबद्दल शशांकनं एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे. (Shashank Ketkar's shared his feelings about ‘Pahile n mi tula!’)

1/5
सहा सासूबाईंचा आहेर! असं म्हणत 2013 मध्ये आलेली 'होणार सून मी या घरची' ही मालिका प्रचंड गाजली. या मालिकेतून घराघरात पोचलेला 'श्री' म्हणजेच सर्वांचा लाडका शशांक केतकरनं पुन्हा आपल्या अभिनयानं चाहत्यांची नवं जिंकली आहेत. झी मराठीवरील ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील समरला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं.

2/5
आता मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र या मालिकेसोबत शशांकच्या अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. याबद्दल शशांकनं एक खास पोस्ट चाहत्यांसाठी शेअर केली आहे.

3/5
समर अर्थात अभिनेता शशांक केतकरनं लिहिलं, ‘शेवटी समर सारख्या नराधमाच्या चेहऱ्याला चिखल फासलाच. पाहिले ना मी तुला ! आणखी एक अत्यंत वेगळं peoject माझ्या वाट्याला आलं.  सगळ्यांचे आभार🙏🏻 प्रोजेक्ट जरी लवकर संपलं असलं तरी या मालिकेमुळे झालेली मैत्री, अनेक आठवणी आणि खलनायकाची भूमिका करण्याचा अनुभव, सगळंच आयुष्यभरासाठी मिळालं.’

4/5
शशांक पुढे लिहितो, ‘सर्व प्रेक्षकांचे आभार ज्यांनी मला या समारच्या रुपात सुध्धा स्वीकारलं किंवा नाकारलं. समरच्या वागण्यावरचा राग व्यक्त केला पण माझ्या भूमिकेचं...कामाचं कौतुकही केलं. पुन्हा एकदा धन्यवाद🙏🏻 भेटूया लवकरच’

5/5
शशांकच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. पोस्टमध्ये त्यानं काही खास फोटोसुद्धा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI