Video | Indian Idol 12च्या मंचावर राखी सावंतची तुफान ‘लावणी’, ‘ड्रामा क्वीन’चा डान्स पाहून चाहते म्हणतात…

बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) लवकरच ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपला एक व्हिडीओ शेअर केला असून, यात ती एका प्रसिद्ध मराठी गाण्यावर लावणी सादर करताना दिसून येत आहे.

Video | Indian Idol 12च्या मंचावर राखी सावंतची तुफान ‘लावणी’, ‘ड्रामा क्वीन’चा डान्स पाहून चाहते म्हणतात...
राखी सावंत

मुंबई : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ अर्थात अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) लवकरच ‘इंडियन आयडॉल 12’ (Indian Idol 12) या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये दिसणार आहे. इन्स्टाग्रामवर तिने आपला एक व्हिडीओ शेअर केला असून, यात ती एका प्रसिद्ध मराठी गाण्यावर लावणी सादर करताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये राखीचा डान्स पाहून मंचावर उपस्थित स्पर्धक आणि परीक्षक तिचे कौतुक करण्यासाठी चक्क खुर्चीवरुन उठले (Actress Rakhi Sawant Dance on Indian Idol 12 stage).

यावेळी राखीने गडद भगव्या रंगाची पारंपारिक महाराष्ट्रीयन नऊवारी साडी परिधान केली होती. फ्रिल गोल्डन ब्लाऊज, हेवी दागदागिने आणि मेकअपने तिने आपला लूक पूर्ण केला आहे. या वेशात तिने चक्क मंचावर तुफान लावणी सादर केली आहे.

पाहा व्हिडीओ :

 

View this post on Instagram

 

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511)

‘रेन डान्स’ चर्चेत

अलीकडेच माध्यमांच्या कॅमेरासमोर राखीने चक्क एका गाण्यावर ठेका धरला होता. राखीचा हा ‘रेन डान्स’ व्हिडीओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये राखी सावंत पावसात नाचताना दिसली. या व्हिडीओमध्ये राखी अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) ‘मोहरा’ चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे गात होती आणि गाणे गाताना ती पावसात नाचत देखील होती.

राखीच्या व्हिडीओवर भरभरून कमेंट

राखीच्या चाहत्यांनी कमेंट सेक्शनमध्ये आपले प्रेम व्यक्त केले, कमेंट सेक्शनमध्ये चाहत्यांनी राखी सावंतचे जोरदार कौतुक केले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘मला तिची हटके शैली आवडते कारण, तिला इतर गोष्टींची अजिबात काळजी नाही.’ दुसर्‍या फॅनने लिहिले, ‘बाकीचे कलाकार जसे शो करण्यासाठी स्वत:ला दर्शवतात, कमीतकमी त्याप्रमाणे ती काल्पनिक खोटेपणा तरी दाखवत नाही.’ त्याचप्रमाणे दुसर्‍या एका वापरकर्त्याने लिहिले की, ‘ही अगदी वेडी आहे’

‘बिग बॉस 14’मधून केले चाहत्यांचे मनोरंजन

सर्वाधिक लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ च्या 14 व्या सीझनमध्ये राखी सावंतच्या एन्ट्रीमुळे हा कार्यक्रम बर्‍यापैकी रंजक झाला होता. या शोमध्ये राखीने तिच्या चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केले आणि शोच्या टॉप-5 फायनलिस्टमध्ये देखील तिने आपले स्थान निश्चित केले होते. त्याचबरोबर शोच्या फिनालेमध्ये राखी सावंतने 14 लाख रुपये घेऊन शोमधून बाहेर पडत सर्वांनाच चकित केले होते. ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालेल्या राखी सावंतने या घरात एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

(Actress Rakhi Sawant Dance on Indian Idol 12 stage)

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Death Anniversary: बॉलिवूड स्टार झाल्यानंतरही सुशांतचं टीव्हीवर पुनरागमन, सीआयडीच्या विषेश भागात लावली होती हजेरी

Yami Gautam : यामी गौतमनं शेअर केला खास व्हिडीओ, चाहते म्हणाले सुंदर वधू…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI