AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sushant Singh Rajput Death Anniversary: बॉलिवूड स्टार झाल्यानंतरही सुशांतचं टीव्हीवर पुनरागमन, सीआयडीच्या विषेश भागात लावली होती हजेरी

2015 मध्ये सुशांतसिंह राजपूतचा डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी हा चित्रपट आला होता.  हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुशांत सीआयडीमध्ये दिसला होता. ज्यानं एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत यांना मुंबई आणि कोलकाता येथे काही केसेस सोडवण्यासाठी मदत केली होती. (Sushant Singh Rajput Death Anniversary : after becoming a Bollywood star, Sushant was Featured in CID )

Sushant Singh Rajput Death Anniversary: बॉलिवूड स्टार झाल्यानंतरही सुशांतचं टीव्हीवर पुनरागमन, सीआयडीच्या विषेश भागात लावली होती हजेरी
| Edited By: | Updated on: Jun 14, 2021 | 9:05 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतनं (Sushant Singh Rajput) आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरूवात एका टीव्ही मालिकेतून केली. ‘किस देश में है मेरा दिल’ या मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. त्यानंतर तो एकता कपूरच्या पवित्र रिश्ता या मालिकेत दिसला. या मालिकेन सुशांतला एक वेगळी ओळख दिली. मानव या व्यक्तिरेखेनं सर्वांचे मन जिंकलं होतं. मालिकांनंतर सुशांतनं बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. बॉलिवूड स्टार झाल्यानंतरही सुशांतचे टीव्हीबरोबरचे संबंध तुटले नाहीत. त्यानं पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन केलं होतं.

सीआयडीच्या एका विशेष भागात टीव्हीवर पुनरागमन

सुशांतने बॉलिवूड स्टार बनल्यानंतर टीव्हीवर पुनरागमन केलं होतं. तो सोनी टीव्हीच्या शो सीआयडीच्या एका विशेष भागात दिसला होता. शोमध्ये तो एका डिटेक्टिव्हच्या भूमिकेत होता.

ब्योमकेश बक्षींच्या भूमिकेत दिसला होता सुशांत

2015 मध्ये सुशांतसिंह राजपूतचा डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी हा चित्रपट आला होता.  हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी सुशांत सीआयडीमध्ये दिसला होता. ज्यानं एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजीत यांना मुंबई आणि कोलकाता येथे काही केसेस सोडवण्यासाठी मदत केली होती.

शोमध्ये सुशांतनं सर्व क्लूज एकत्र करून केस सोडवण्याचा प्रयत्न केला होता. शोमध्ये जेव्हा तो मुंबईला येतो तेव्हा त्याला कळतं की कोलकाताशी संबंध असलेल्या एका हत्येची सीआयडी टीम चौकशी करत आहे.

त्यानंतर तो सीआयडीच्या टीमसह मारेकरी शोधतो आणि तो भाग एका चांगल्या टिपणीवर संपतो. शोमध्ये सुशांतसोबत आनंद तिवारीही दिसला होता.

समीक्षकांच्या उतरला पसंतीस

सुशांतच्या या चित्रपटाला समीक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. वृत्तानुसार या चित्रपटाचा सिक्वल आणण्याची तयारी सुरू होती. पण सुशांतच्या मृत्यूनंतर हे शक्य झालं नाही.

सुशांतनं गेल्या वर्षी 14 जूनला आत्महत्या करत जगाचा निरोप घेतला. सुशांत हा त्याच्या मुंबईच्या घरी मृत अवस्थेत आढळला होता. सीबीआय आणि एनसीबी या प्रकरणाच्या चौकशीत गुंतले आहेत. एनसीबीनं ड्रग्स अँगलमध्ये बऱ्याच लोकांना अटक केली होती. नुकतंच सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला एनसीबीनं अटक केली आहे. इतकेच नाही तर या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेन्ड रिया चक्रवर्तीलाही अटक करण्यात आली होती. ती जवळपास 1 महिन्यासाठी तुरूंगात होती. रिया सध्या जामिनावर बाहेर आहे.

संबंधित बातम्या

Ankita Lokhande : सुशांतच्या पुण्यतिथीच्या एक दिवस आधी अंकिता लोखंडेनं शेअर केला खास फोटो, लिहिलं ‘अंतरानं काही फरक पडत नाही कारण …’

Haseen Dillruba Review : ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित, सुंदर कथानक आणि हटके स्टारकास्टसह परफेक्ट मर्डर मिस्ट्री तुमच्या भेटीला…

Pratyusha Banerjee : मृत्यूच्या 5 वर्षांनंतर मोठी माहिती समोर, मुलाखत देत विकास गुप्तानं केला ‘हा’ खुलासा

माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....