राज कुंद्रावर नग्न ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप, आता बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा अभिनेत्रीचा दावा

राज कुंद्राने (Raj Kundra) न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप करणार्‍या मॉडेल सागरिका शोना सुमनने (Sagarika shona Suman) तिच्या नव्या दाव्याने खळबळ उडवली आहे.

राज कुंद्रावर नग्न ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप, आता बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा अभिनेत्रीचा दावा
सागरिका सुमन-राज कुंद्रा

मुंबई : राज कुंद्राने (Raj Kundra) न्यूड ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप करणार्‍या मॉडेल सागरिका शोना सुमनने (Sagarika shona Suman) तिच्या नव्या दाव्याने खळबळ उडवली आहे. गुरुवारी (22 जुलै) सागरिका शोना यांनी दावा केला की, राज कुंद्राविरोधात बोलल्यानंतर तिला सतत धमकी देणारे कॉल येत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सागरिकाने म्हटले आहे की, तिला व्हॉट्सअ‍ॅप आणि मेसेंजरवर प्राणघातक आणि बलात्काराच्या धमक्या मिळत आहेत.

अहवालानुसार सागरिका म्हणाली- “मी खूप निराश आणि दुःखी आहे, कारण मला वेगवेगळ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवरुन सतत धमकीचे कॉल येत आहेत. ते मला धमकावत आहेत. मला जीवे मारण्याच्या धमक्या आणि बलात्काराच्या धमक्या देत ​​आहे. लोक मला वेगवेगळ्या नंबरवरून कॉल करत आहेत आणि मला विचारत आहेत की राज कुंद्राने काय चूक केली आहे? ”

सागरिका तक्रार दाखल करणार

सागरिका पुढे म्हणाली की, ते मला सतत धमकावत आहेत आणि त्यांचा व्यवसाय बंद केल्याचा आरोप करत आहेत. त्याने असेही म्हटले की, तुम्ही लोक अश्लील चित्रपट पाहता म्हणूनच आम्ही ते बनवत आहोत. सागरिका असेही सांगते की, तिचा जीव धोक्यात आहे. ही बाब गंभीरपणे घेत ती आता पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहे.

काय आहेत सागरिकाचे आरोप?

“मी सागरिका सोना सुमन. हे अश्लील चित्रपटांचं एक मोठं रॅकेट आहे. यामध्ये बड्या लोकांचा सहभाग आहे. राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं आहे. लॉकडाऊनच्या काळात मलाही एक वाईट अनुभव आला होता. ऑगस्ट 2020 मध्ये मला एका वेब सीरीजमध्ये काम करण्याची ऑफर आली. मी होकार दिल्यावर राज कुंद्राच्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर उमेश कामत यांचा मला फोन आला. माझी ऑनलाईन ऑडिशन घेण्याचं ठरलं. मी व्हिडीओ कॉल जॉईन केल्यानंतर माझ्याकडे नग्न ऑडिशन देण्याची मागणी केली. मला धक्का बसला, आणि मी नकार देत कॉल बंद केला,” असा दावा अभिनेत्री सागरिका सोना सुमन हिने केला होता.

या व्हिडीओ कॉलमध्ये तिघे जण होते. त्यापैकी एकाचा चेहरा झाकलेला होता, तर एक बहुतेक राज कुंद्रा होता. जर तो यात सहभागी असेल, त्याला अटक करुन या रॅकेटचा पर्दाफाश करावा, अशी मागणीही सागरिकाने केली आहे.

(Actress Sagarika shona suman claims that she is getting threat calls after accusing raj kundra)

हेही वाचा :

Shilpa Shetty’s First Reaction | पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, व्यक्त केल्या मनातील भावना

Raj Kundra Arrest : राज कुंद्रा यांनी दीड वर्षात 100 पेक्षा अधिक अश्लील चित्रपट बनवले? गुन्हे शाखेला मोठा साठा उपलब्ध

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI