AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nusrat Jahan : अभिनेत्री-टीएमसी खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात; आज होणार आई?

निखिल जैननं दावा केला होता की मूल हे त्याचं नसून सध्या नुसरत यशसोबत असते. तर हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितलं आहे की सी-सेक्शनची प्रक्रिया आजपासून सुरू होईल. आवश्यक असल्यास, शस्त्रक्रिया केली जाईल. (Actress-TMC MP Nusrat Jahan in hospital)

Nusrat Jahan : अभिनेत्री-टीएमसी खासदार नुसरत जहाँ रुग्णालयात; आज होणार आई?
| Edited By: | Updated on: Aug 26, 2021 | 1:45 PM
Share

मुंबई : सुप्रसिद्ध टीएमसी खासदार (TMC MP) आणि अभिनेत्री नुसरत जहाँ (Actress Nusrat Jahan) आज आपल्या पहिल्या मुलाला जन्म देऊ शकते. पती निखिलपासून विभक्त झाल्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.  बुधवारी तिला पार्कस्ट्रीट येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यावेळी अभिनेता यश दासगुप्ताही तिच्यासोबत होता. गुरुवारी सकाळी तिनं हॉस्पिटलमधून स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. काही महिन्यांपूर्वी जेव्हा ती आपल्या पतीपासून विभक्त झाली तेव्हा ती निखिलसोबत लिव्ह-इनमध्ये राहत असल्याचा दावा केला जातोय.

निखिल जैननं दावा केला होता की मूल हे त्याचं नसून सध्या नुसरत यशसोबत असते. हॉस्पिटलच्या सूत्रांनी सांगितलं आहे की सी-सेक्शनची प्रक्रिया आजपासून सुरू होईल. आवश्यक असल्यास, शस्त्रक्रिया केली जाईल. नुसरतचं नाव बंगाली चित्रपट अभिनेता यश दासगुप्ताशी जोडलं जात आहे. यश दासगुप्तानं नुसरत जहाँच्या आई होणार असल्याबद्दल आनंद व्यक्त केला होता.

पाहा नुसरतची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Nusrat (@nusratchirps)

नवऱ्यापासून विभक्त झाल्यानंतर चर्चेत 

नुसरत काही महिन्यांपूर्वी तिचं लग्न तुटल्यामुळे चर्चेत आली होती. कोलकाता येथील उद्योजक निखिल जैन याच्याशी तिचं लग्न वादात सापडलं तेव्हा तिनं आपलं हे लग्न अवैध असल्याचं सांगितलं होतं. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून हे दोघं वेगळे राहत होते. नुसरतनं सांगितलं होतं की तिचं निखिलसोबतच लग्न अवैध आहे कारण ते तुर्की रीतीरिवाजांनुसार झालं होतं आणि भारतात विशेष विवाह कायद्यानुसार याला मान्यता नाही, त्यामुळे घटस्फोटाचं कारणच येत नाही.

पती निखिल जैननं केले अनेक आरोप

यानंतर निखिलनं नुसरतवर अनेक आरोपही केले होते, त्यानं म्हटलं होतं की नुसरतनं त्याच्याकडून खूप पैसे घेतले होते आणि नुसरतच्या पोटातील मूल हे त्याचं नाही. निखिल आणि नुसरत यांनी 2019 मध्ये तुर्कस्तानच्या बोडरम येथं धूमधडाक्यात लग्न केलं होतं.

संबंधित बातम्या

Monalisa : निळाशार समुद्र… वाळू… रणरणते उन आणि मोनालिसाचा बोल्डनेसचा तडका; फोटो पाहाच

Shama Sikandar : शमा सिकंदरची टोपीसोबत हॉट फोटो पोज, बोल्ड स्टाईलनं वाढला इंटरनेटचा पारा

Kabir Khan | मुघल राष्ट्रनिर्माते, राक्षसी प्रतिमा दाखवणारे चित्रपट पाहणं क्लेशदायी, दिग्दर्शक कबीर खानचं मत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.