अल्लू अर्जुला बंपर लॉटरी, ‘पुष्पा 2’ची कोटीच्या कोटी उड्डाणे, अभिनेत्याची तुरुंगातून सुटका होताच कमाईचा ऐतिहासिक रेकॉर्ड
थिअटरमध्ये झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणात 'पुष्पा 2'चा अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली होती, अभिनेत्याच्या सुटकेनंतर पुष्पा 2 चित्रपटाच्या तिकीट विक्रीमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.

थिअटरमध्ये झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणात ‘पुष्पा 2’चा अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली होती, त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली,मात्र त्यानंतर लगेचच त्याला जामीन देखील मिळाला. सध्या पुष्पा 2 हा चिटपत्रट बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घालत आहे, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या या चित्रपटानं कमाईचा एक नवा ऐतिहासिक रेकॉर्ड तयार केला आहे. दरम्यान अल्लू अर्जुनची तुरुंगातून सुटका झाल्यानंतर तर या चित्रपटाच्या तिकीट विक्रीमध्ये तब्बल 70 टक्के वाढ झाली आहे.
या चित्रपटाचे बुक माय शो या एकट्या अँपवर आतापर्यंत तब्बल 1.5 कोटी तिकिटांची विक्री झाली आहे, हा एक रेकॉर्ड आहे.मात्र अजूनही हा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपट गृहात गर्दी सुरू असून, सर्व शो हे हाऊसफुल्ल आहेत. अल्लू अर्जुनला अटक आणि त्याच्या सुटकेनंतर तर या चित्रपटाच्या तिकीट विक्रीमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.
अल्लू अर्जुनच्या सुटकेनंत शनिवारी या चित्रपटाच्या कमाईमध्ये भारतात तब्बल 74 टक्क्यांची वाढ झाली तर जगभरात 70 टक्के वाढ झाली.अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 या चित्रपटानं पहिल्या 11 दिवसांमध्येच ‘केजीएफ चैप्टर 2’च्या लाइफटाइम कलेक्शनला मागे टाकलं आहे. या चित्रपटाचा ग्लोबल बॉक्स ऑफिसवर देखील दबदबा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पाच डिसेंबरला चित्रपट गृहात रिलीज झाला होता. आतापर्यंत या चित्रपटाची कमाई 1300 कोटींच्या घरात पोहोचली आहे. एका रिपोर्टनुसार या चित्रपटानं आकरा दिवसांमध्ये 1302.60 कोटी रुपयांचा व्यावसाय केला. रविवारी या चित्रपटानं ‘केजीएफ चैप्टर 2’चं रेकॉर्ड तोडलं या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 1215 कोटी रुपयांचा गल्ला जमावला होता.शाहरुखच्या जवान चित्रपटाचं देखील रेकॉर्ड या चित्रपटानं तोडलं आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
पुष्पा 2 शोच्या दरम्यान हैदराबादच्या एका थिअटरमध्ये चेंगराचेंगरी झाली. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणात अल्लू अर्जून याला हैदराबाद पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, मात्र त्यानंतर लगेचच त्याला जामीन मिळाला. ज्या पद्धतीनं अटक झाली त्यावर अभिनेत्यानं संताप व्यक्त केला होता.
