AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Deepika Padukone: सेटवर दीपिकाची तब्येत बिघडताच प्रभासने घेतला मोठा निर्णय

हैदराबादमध्ये 'बाहुबली' फेम अभिनेता प्रभाससोबत ती 'प्रोजेक्ट के' या चित्रपटाचं शूटिंग करत होती. हृदयाचे ठोके वाढल्याने दीपिकाला अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Deepika Padukone: सेटवर दीपिकाची तब्येत बिघडताच प्रभासने घेतला मोठा निर्णय
Prabhas and Deepika PadukoneImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jun 16, 2022 | 11:32 AM
Share

चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) तब्येत अचानक बिघडल्यामुळे तिला हैदराबाद (Hyderabad) इथल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. हैदराबादमध्ये ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभाससोबत ती ‘प्रोजेक्ट के’ या चित्रपटाचं शूटिंग करत होती. हृदयाचे ठोके वाढल्याने दीपिकाला अस्वस्थ वाटू लागलं होतं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता दीपिकाची प्रकृती ठीक असून सहकलाकार प्रभासने तिच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दीपिका आणि प्रभास हे रामोजी फिल्म सिटीमध्ये आठवडाभर शूटिंग करणार होते. मात्र आता ती पूर्णपणे बरी होईपर्यंत प्रभासने शूटिंग शेड्युल पुढे ढकलण्यास सांगितलं आहे.

“दीपिका आणि प्रभास यांचे अत्यंत महत्त्वपूर्ण सीन्स तिथे शूट होणार होते. पण प्रभासने शूटिंगचं शेड्युल पुढे ढकलण्यास सांगितलं. आता एक आठवड्यानंतर पुन्हा शूटिंगला सुरुवात होईल. दीपिकाची प्रकृती स्थिर असून तिच्या आरोग्याची विशेष काळजी घेतली जात आहे. तिला बरं वाटल्यास शूटिंगला पुन्हा सुरुवात होईल. प्रभासने तिच्यावर तो निर्णय सोपवला आहे”, अशी माहिती सूत्रांनी दिली.

इन्स्टा पोस्ट-

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या कामाचं शेड्युल अत्यंत व्यग्र असल्याने तब्येत बिघडल्याचं म्हटलं जातंय. ‘कान फिल्म फेस्टिव्हल’मध्ये दीपिका परीक्षक म्हणून सहभागी झाली होती. कानवरून परतताच तिने लगेच शूटिंगला सुरुवात केली. या सर्व घडामोडींदरम्यान तिला पुरेसा आराम मिळाला नाही. दीपिका रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती मिळताच चाहत्यांनी सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली. मात्र थोड्या वेळानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

प्रोजेक्ट के या चित्रपटात दीपिका आणि प्रभास यांच्या मुख्य भूमिका आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका पहिल्यांदाच प्रभाससोबत काम करतेय. याशिवाय ती रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातही पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकणार असल्याचं कळतंय.

टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.