श्रीदेवीनंतर फक्त मीच विनोदी भूमिका करते, कंगनाच्या दाव्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच टार्गेट असते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:54 PM, 25 Feb 2021
श्रीदेवीनंतर फक्त मीच विनोदी भूमिका करते, कंगनाच्या दाव्याची नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली!

मुंबई : कंगना रनौत (Kangana Ranaut) सध्या सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. कंगना तिच्या वादग्रस्त ट्विटमुळे नेहमीच टार्गेट असते. आता कंगनाने अशाच प्रकारचे एक वादग्रस्त ट्विट केलं आहे. कंगनाने आता नवीन दावा केला आहे की, श्रीदेवीनंतर ती फक्त भारतातली एकमेव अभिनेत्री अशी आहे की, ती पदद्यावर खऱ्या अर्थाने विनोदी भूमिका करते. (After Sridevi, only I do comedic roles, Kangana Ranaut claims)

दरवेळीप्रमाणेच आता कंगनाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाने म्हटंले होते की, टॉम क्रूझपेक्षा मी उत्कृष्ट स्टंट करते. कंगनाच्या या दाव्यानंतर तिला ट्विटरवर बरेच ट्रोल केले जात होते. काहीजण म्हणाले की, तुझ्यापेक्षा भारती सिंह चांगली कॉमेडी करते. तर काहीजण म्हणाले की, तू जे आता बोलत आहेस तिच खूप मोठी कॉमेडी आहे.

कंगनाने काही दिवसांपूर्वी तिचे आणि वडिलांचे नाते कसे होते याबद्दल सांगितले होते. हे सांगताना कंगनाने एक वादग्रस्त विधान केले होते आणि त्यानंतरच तिला ट्रोल केलं गेले होते.
मी वयाच्या 15 व्या वर्षी त्यांच्यासोबत भांडणे केली होती आणि मी 15 व्या वर्षी माझे घर सोडले होते. दुसर्‍या ट्विटमध्ये कंगना लिहिली होते की, या चिल्लर इंडस्ट्रीचा लोकांना असे वाटते की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात गेले आहे.

पण मी नेहमीच वाघ होते, फक्त माझ्या यशामुळे माझा आवाज बुलंद झाला आहे. आज मी देशाचा सर्वात मोठा महत्वाचा आवाज आहे. इतिहास हा साक्षीदार आहे ज्याने मला सुधारण्याचा प्रयत्न केला. अशा लोकांना मीच सुधारले आहे. दुसर्‍या ट्विटमध्ये कंगनाने वडिलांच्या फोटो शेअर करत लिहिले होके की, माझ्या वडिलांना मला सर्वोत्कृष्ट डॉक्टर बनवायचे होते.

जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला चापट मारण्याचा प्रयत्न केला, मी त्यांचा हात धरला आणि म्हणाले की, जर तुम्ही मला मारहाण केली तर मीसुद्धा तुम्हाला मारेल…त्यावेळी माझ्या वडिलांनी फक्त मला पाहिले आणि माझ्या आईला पाहिले आणि निघून रूममध्ये गेले होते.

संबंधित बातम्या : 

मालदीवच्या समुद्र किनाऱ्यावर शिल्पा शेट्टीचा घायाळ करणारा अंदाज!

गंगूबाईचा रोल आलियाच्या नशिबी नव्हता, भन्साळींची पहिली पसंती होती ‘या’ हिरॉईनला

Video : जॉन अब्राहम-इमरान हाश्मीचा ‘मुंबई सागा’चा टीझर पाहिला का?

(After Sridevi, only I do comedic roles, Kangana Ranaut claims)