AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाऊ आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखच्या लेकीने घेतला मोठा निर्णय, ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल!

बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Arrest) ड्रग्स प्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांडवर पाठवण्यात आले आहे. वास्तविक, आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील ड्रग पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर स्टार किड्स पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत.

भाऊ आर्यनच्या अटकेनंतर शाहरुखच्या लेकीने घेतला मोठा निर्णय, ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी लढवली शक्कल!
Shah Rukh Khan Family
| Edited By: | Updated on: Oct 06, 2021 | 11:38 AM
Share

मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan Arrest) ड्रग्स प्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी रिमांडवर पाठवण्यात आले आहे. वास्तविक, आर्यनला मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावरील ड्रग पार्टीमध्ये सहभागी झाल्यामुळे ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर स्टार किड्स पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले आहेत. शाहरुखची मुलगी सुहानाच्या (Suhana Khan) इन्स्टाग्रामवरही तिच्यावर कमेंट करत ट्रोलर्स तिला ट्रोल करत असतात. मात्र, आता आर्यन जेलमध्ये गेल्यानंतर आता त्याची बहीण सुहाना खानने एक मोठे पाऊल उचलले आहे.

सुहाना खान सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह आहे, ती अनेकदा तिचे फोटो तिच्या चाहत्यांसोबत तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करायला विसरत नाही. पण, आता भावाच्या अटकेनंतर लोक सोशल मीडियावर सुहाना देखील ट्रोल करू पाहत आहेत. यामुळे सुहाना खानने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटमध्ये कमेंट सेक्शन बंद केला आहे. जेणेकरून कोणीही तिच्यावर नकारात्मक प्रतिक्रिया देऊ शकणार नाही. तत्पूर्वी तिचे कमेंट सेक्शन खुला होता. या काळात परदेशात राहून सुहाना आपले शिक्षण पूर्ण करत आहे.

शाहरुखच्या लेकाची कोठडी वाढवली!

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला 7 ऑक्टोबरपर्यंत कारागृहात असणाऱ्या आर्यन ड्रग्स प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही. न्यायालयाने अभिनेत्याच्या मुलाला 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीच्या ताब्यात ठेवण्यास सांगितले आहे. तो 7 ऑक्टोबरला पुन्हा हजर होईल. आर्यनच्या तुरुंगवासानंतर शाहरुख खानच्या कुटुंबाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

आर्यन खान ढसाढसा रडला

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

NCB च्या मदतीला अन्य राज्यातील अधिकारी

एकीकडे मुंबई पोलिसांनी ड्रग्जप्रकरणाच्या केसमध्ये एण्ट्री घेतली असली तरी NCB नेही मोठी तयारी केली आहे. एनसीबीच्या मदतीसाठी अनेक राज्यातून एनसीबीचे अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत. गुजरात , मध्य प्रदेश , दिल्ली येथून एनसीबी अधिकारी मुंबईत आले आहेत. मुंबई एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रवासी जहाजावर मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात अनेक आरोपी आहेत. अनेकांची चौकशी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई झोनल ऑफिसमधील अधिकारी संख्येने कमी आहेत. याचमुळे इतर राज्यातून अधिकारी मुंबईत दाखल झाले आहेत.

हेही वाचा :

ड्रग्ज प्रकरणात अटकेनंतरही पालकांकडून पोरांचे लाड, बर्गर घेऊन आई NCB ऑफिसबाहेर

जो अख्खं जहाज खरेदी करु शकतो, त्याला ड्रग्ज विकायची गरज काय, आर्यन खानच्या युक्तीवादातील 10 मुद्दे

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.