सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर आता लॉरेन्स बिश्नोई याने केले अत्यंत मोठे खुलासे, म्हणाला, एका वर्षापासूनच सर्व…

सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर संपूर्ण देश हादरला. आता सिद्धू मूसेवाला याच्या हत्येला जवळपास दहा महिने झाले आहेत. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर आता लॉरेन्स बिश्नोई याने केले अत्यंत मोठे खुलासे, म्हणाला, एका वर्षापासूनच सर्व...
Lawrence Bishnoi, Sidhu Moosewala
Follow us
| Updated on: Mar 14, 2023 | 9:09 PM

मुंबई : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moosewala) याच्या हत्येला आता जवळपास दहा महिने झाले आहेत. मानसा जिल्ह्यात अज्ञात व्यक्तींनी सिद्धू मूसेवाला याच्यावर गोळीबार केला. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर पंजाबसह संपूर्ण देश हादरला. या गोळीबारात सिद्धू मूसेवाला याचा जागीच मृत्यू झाला. या सर्व प्रकरणामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) याचे नाव समोर आले. इतके नाहीतर काही दिवसांपूर्वीच लॉरेन्स बिश्नोई याने आपणच सिद्धू मूसेवाला याची हत्या केल्याचे कबुल केले होते. आता नुकताच याचप्रकरणात लॉरेन्स बिश्नोई याने अत्यंत मोठा खुलासा केलाय.

लॉरेन्स बिश्नोई याने आता मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. सिद्धू मूसेवाला याच्या हत्येचे सर्व नियोजन कशाप्रकारे आणि कधीपासून केले गेले हे सांगताना लॉरेन्स बिश्नोई हा दिसला. एका चॅनलला बोलताना लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, सिद्धू मूसेवाला याला मारण्याचे प्लानिंग आम्ही एका वर्षापासून करत होतो.

पुढे लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, गोल्डी बरार यानेच सिद्धू मूसेवाला याची हत्या करायला लावलीये. आता लॉरेन्स बिश्नोई याच्या या खुलाशाने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. म्हणजेच सिद्धू मूसेवाला हा एक वर्षांपासून लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीच्या निशाण्यावर होता. फक्त हे सिद्धू मूसेवाला याला मारण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहात होते.

लॉरेन्स बिश्नोई म्हणाला की, सिद्धू मूसेवाला याच्या हत्येमध्ये गोल्डी बरारचा हात होता. मला या हत्येबद्दल अगोदरच सर्व काही माहिती होते. पण त्यामध्ये माझा काही हात नव्हता. मूसेवाला हा अँटी गँग मजबूत करत होता. मी गोल्डीला सांगितले होते की, सिद्धू मूसेवाला हा आपला दुश्मन आहे.

सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. विशेष म्हणजे सिद्धू मूसेवाला याच्यासोबत त्याच्या गाडीमध्ये हत्येच्या वेळी काही मित्रही होते. मात्र, मारेकऱ्यांच्या निशाण्यावर फक्त सिद्धू मूसेवाला हाच होता. गाडीमध्ये असलेल्या सिद्धू मूसेवाला याच्या मित्रांना किरकोळ जखमा झाल्या.

सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर त्याचे कुटुंबिय पूर्णपणे तुटलेले दिसले. सिद्धू मूसेवाला याच्या अंत्यविधीचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले होते. यावेळी सिद्धू मूसेवाला याला शेवटचा निरोप देण्यासाठी संख्य लोक उपस्थित होते. पोलिसांनी सिद्धू मूसेवाला याच्या हत्येनंतर तपासाची चक्रे फिरवली होती.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.