AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले…

aishwarya rai: बच्चन कुटुंबाच्या सुनेचे परदेशी भूमीवरचे संस्कार पाहिल्यानंतर सगळेच तिचे चाहते भारावले आहेत. ऐश्वर्या रायची हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. त्यावर अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

ना मणिरत्नम, ना अमिताभ बच्चन, ऐश्वर्या रायने या सुपरस्टारचे पाय धरले, व्हिडियो पाहून युजर म्हणाले...
aishwarya rai
| Updated on: Oct 01, 2024 | 7:11 AM
Share

बॉलीवूड अभिनेत्री आणि बच्चन कुटुंबातील सून ऐश्वर्या राय बच्चन नेहमी चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कारणांमुळे वेगवेगळी चर्चा होत आहे. सध्या ऐश्वर्या राय मुलगी आराध्यासह अबू धाबीमध्ये गेली आहे. 24 व्या आयफा अवार्ड्स मध्ये तिला गौरवण्यात आले आहे. तिचा ‘पोन्नियिन सेलवन 2’ चित्रपटाला बेस्ट एक्ट्रेसचा (तामिळ) पुरस्कार मिळाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर तिने तिचे गुरु मणिरत्नम यांचे पाय धरल्याचा व्हिडिओ एका दिवसापूर्वी व्हायरल झाला होता. आता आणखी एका सुपरस्टारकडून तिने आशीर्वाद घेतले आहे. हा व्हिडिओसुद्धा चांगला व्हायरल झाला आहे. बच्चन कुटुंबातील सुनेचे संस्कार पाहून युजर कॉमेंट व्यक्त करत आहेत. आता साउथचे सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचे आशीर्वाद ऐश्वर्याने घेतले. तिला त्यांच्याकडूनच बेस्ट्र एक्ट्रेस पुरस्कार दिले गेले आहे.

व्हिडिओ झाला व्हायरल

नंदामुरी बालकृष्ण स्टेजवर आले. ऐश्वर्या राय बच्चन हिला पुरस्कार देण्यास सुरुवात करताच ऐश्वर्याने ट्रॉफी घेण्यापूर्वी त्याच्या पायांना स्पर्श केला. त्यानंतर नंदामुरी यांनी तिला प्रथम आशीर्वाद दिला. त्यानंतर तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीची पुरस्कार देण्यात आली. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. सलग दुसऱ्या दिवशी व्यासपीठावर ऐश्वर्याने मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. तिच्या या निर्णयाने युजर्स चांगलेच भरावले आहे.

ऐश्वर्याने मणिरत्नम यांच्याबद्दल म्हणाले…

ऐश्वर्या राय बच्चन हिने यापूर्वी मणिरत्नम यांच्याकडून आशीर्वाद घेतले होते. ऐश्वर्या आयफा पुरस्कारात सर्वोत्कृष्ट कलाकराचा पुरस्कार मिळाला. तिला मणिरत्नम यांना ‘पोनियिन सेल्वन 2’ मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार दिला. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली, की माझे गुरु या ठिकाणी आहेत. मणिरत्नम यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. पोन्नियिन सेल्वन चित्रपटामध्ये नंदिनीची भूमिका साकारणे हा माझा सन्मान होता.

बच्चन कुटुंबाच्या सुनेचे परदेशी भूमीवरचे संस्कार पाहिल्यानंतर सगळेच तिचे चाहते भारावले आहेत. ऐश्वर्या रायची हा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे. त्यावर अनेक चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.