AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजय देवगणची लेक न्यासा झाली 18 वर्षांची, अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा!

बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याची लेक न्यासा (Nysa) हिचा आज 18वा वाढदिवस आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजयने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अजय देवगणची लेक न्यासा झाली 18 वर्षांची, अभिनेत्याने खास पोस्ट शेअर करत दिल्या शुभेच्छा!
न्यासा आणि अजय देवगण
| Updated on: Apr 20, 2021 | 11:29 AM
Share

मुंबई : बॉलिवूडचा ‘सिंघम’ अर्थात अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) याची लेक न्यासा (Nysa) हिचा आज 18वा वाढदिवस आहे. आपल्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अजयने एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अजयने न्यासाबरोबर एक फोटो शेअर केला आहे. फोटोत अजय न्यासाला मिठी मारली आहे आणि दोघेही कॅमेर्‍याकडे पाहत फोटो पोझ देत आहेत. आपल्या मुलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अजयने खास आशीर्वाद मागितला आहे. तथापि, हा आशीर्वाद केवळ न्यासासाठी नसून प्रत्येकासाठी आहे (Ajay Devgn daughter nysa turn 18 actor share special post on social media).

अजयने फोटो शेअर करत लिहिले की, ‘हॅपी बर्थडे न्यासा, अशा कठीण काळात अशा लहान आनंदानं संपूर्ण टेन्शन कमी केलं. या व्यतिरिक्त ज्यांना या टेन्शनमधून बाहेर पडण्याची गरज आहे, अशा सर्वांसाठी मी प्रार्थना करतो.’ आपल्या मुलीच्या वाढदिवशी त्याने प्रत्येकासाठी प्रार्थना केली आहे. चाहत्यांना अजयचे ही पोस्ट इतके आवडले आहे की, सगळेच त्याचे कौतुक करत आहेत.

पाहा अजय देवगणची पोस्ट

View this post on Instagram

A post shared by Ajay Devgn (@ajaydevgn)

अजयचा सल्ला नेहमी लक्षात ठेवते न्यासा

न्यासाने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ बनवला होता, ज्यात तिने अजयला कोणता सल्ला दिला होता, जो ती नेहमी लक्षात ठेवते, याबद्दल सांगितले होते. न्यासाचा हा व्हिडीओ काजोलने शेअर केला होता. न्यारसा सांगते, ‘माझ्या वडिलांनी मला एक सल्ला दिला जो मी नेहमी लक्षात ठेवतो आणि यातून मिळणाऱ्या शांततेमुळे मला आनंद होतो. वडिलांनी मला सांगितले आहे की, मी कष्ट केले तर मी काहीही करू शकते. असे बरेच लोक आहेत जे माझ्याबद्दल चांगले बोलतात आणि हे माझ्या पालकांवर प्रतिबिंबित होते.’(Ajay Devgn daughter nysa turn 18 actor share special post on social media)

लेकीच्या बॉयफ्रेंडवर कशी असेल अजयची प्रतिक्रिया?

काजोलने करीना कपूरच्या चॅट शोमध्ये सांगितले होते की, न्यासाला या बाबत कधी सल्ला घ्यावा लागला तर ती माझ्याकडे येईल. काजोल म्हणाली होती, जर न्यासाच्या आयुष्यात कधीही बॉयफ्रेंड आला, तर ती तिच्या वडिलांना सांगणार नाही,. कारण न्यासाने सांगितले तर अजय बंदूक घेऊन उभा राहून म्हणेल- कुठे आहे तो? काजोलचे ऐकल्यानंतर करीनालाही तिचे हसू थांबवता आले नाही.

मुलांच्या प्रायव्हसीबाबत अजय म्हणतो..

न्यासाचे फोटो सोशल मीडियावर बरेच व्हायरल झाले आहेत. बर्‍याच वेळा न्यासाला ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. अजय एकदा या विषयावर माध्यमांना म्हणाला होता की, ‘माझी विनंती आहे की मुलांना एकटे सोडा. जर पालक सेलिब्रेटी असतील तर, मग मुलांनी नुकसान का सहन करावे? मुलांना त्यांची स्वतःची वैयक्तिक स्पेस द्या.’ न्यासा सध्या सिंगापूरमध्ये शिक्षण घेत आहे. काजोल देखील न्यासाबरोबर सिंगापूरमध्ये राहत आहे.

(Ajay Devgn daughter nysa turn 18 actor share special post on social media)

हेही वाचा :

बॉलिवूडचं ‘परफेक्ट कपल’ ऐश्वर्या-अभिषेक बच्चन, जाणून घ्या त्यांच्या ‘हॅप्पी मॅरीड लाईफ’चं गुपित…

Indian Idol 12 Update | सवाई भटसोबतच नेहा कक्करही ‘इंडियन आयडॉल’मध्ये गैरहजर! जाणून घ्या कारण…

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.