AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जय पवार यांचा अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, कोण आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री?

Jay Pawar : जय पवार यांचा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्री सोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. जय पवार त्याचा एक मित्र आणि ही अभिनेत्री असा तिघांचा फोटो सध्या व्हायरल होतोय.

जय पवार यांचा अभिनेत्रीसोबतचा फोटो व्हायरल, कोण आहे ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री?
Image Credit source: TV9
| Updated on: Mar 25, 2022 | 5:08 PM
Share

मुंबई : बारामतीतील पवार (Pawar) घराण्याचा राज्यासह देशाच्या राजकारणात दबदबा आहे. याच पवार घराण्याचे सुपुत्र जय पवार (Jay Pawar) यांचा एक फोटो सध्या वाऱ्यासारखा व्हायरल होतोय. जय पवार यांचा बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्री (Bollywood Actress) सोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. जय पवार, त्याचा एक मित्र आणि ही अभिनेत्री असा तिघांचा फोटो सध्या व्हायरल होतोय. ही अभिनेत्री कोण आहे याविषयी जाणून घेऊयात…

जय पवार यांचा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रीसोबतचा फोटो सध्या व्हायरल होतोय. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. उर्वशीसोबतच्या जय यांच्या एका फोटोने सध्या सोशल मीडिया व्यापून टाकलाय. या फोटोत उर्वशीने स्कीन कलरचा वनपीस घातलाय. तिच्या शेजारी जय आणि उर्वशीचा कॉमन मित्र आणि या मित्राच्या शेजारी जय उभे आहेत. तिघेही कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

जय पवार कोण आहेत?

जय पवार हे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आहेत. तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आहेत. अजित पवार यांना दोन मुलं आहेत. मोठा मुलगा पार्थ यांनी मावळची लोकसभा निवडणूक लढवली. ज्यात त्यांचा दारूण पराभव झाला. तर जय हे सध्या बारामतीतील समाजकारणात सक्रीय आहेत.

View this post on Instagram

A post shared by Jay Pawar (@jayajitpawar)

उर्वशी रौतेला कोण आहे?

उर्वशी रौतेला ही बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने हेट लव्ह स्टोरी 4, सनम रे, ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, पागलपंती, साईझ झिरो, मिस मॅच इंडिया, अंबरसरिया, ब्लॅक रोज, भाग जॉनी या सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती तिच्या बोल्ड फोटोंसाठी ओळखली जाते. ती नेहमी तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर असे फोटो शेअर करत असते.

संबंधित बातम्या

“माझ्या आईने ती बातमी पाहिली असती तर तिला हार्ट अटॅकच आला असता”; फरदीन खानने सांगितला अनुभव

Dil Se Dil Tak Music Album : ‘दिल से दिल तक’ म्युझिक अल्बम रिलीज, 10 गाणी, 10 प्रकारचं संगीत एकाच ठिकाणी ऐका…

विवेक अग्निहोत्री पुन्हा वादात, म्हणतात “भोपाळी” म्हणजे समलैंगिक, तर दिग्विजय सिंह म्हणतात हा संगतीचा परिणाम…

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.