Bachchan Pandey | राउडी गँगस्टर अक्षयचा लुक बघून चाहते अचंबित, नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

अक्षय कुमारने (Akshay Kumar) त्याचा आगामी बच्चन पांडे (Bachchan Pandey) चित्रपटचे शूटिंग सुरू केले आहे.

Bachchan Pandey | राउडी गँगस्टर अक्षयचा लुक बघून चाहते अचंबित, नव्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात!

मुंबई : अक्षय कुमारने (Akshay Kumar) आगामी बच्चन पांडे (Bachchan Pandey) चित्रपटचे शूटिंग सुरू केले आहे. अक्षयने नुकताच चित्रपटातील त्याच्या नव्या लूकचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अक्षय राउडी गँगस्टर लूकमध्ये दिसत आहे. या फोटोत अक्षयने काळ्या रंगाचा कुर्ता आणि निळा जीन्स घातलेली दिसत आहे. याशिवाय त्याने डोक्यावर लाल रंगाचा रूमाल बांधलेला दिसत आहे. (Akshay Kumar has started shooting for his upcoming Bachchan Pandey film)

या नवीन लूकमधील फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले आहे की, नवीन वर्ष बच्चन पांडे चित्रपटाचे शूटिंग सुरू साजिद नाडियाडवाला सोबत हा माझा दहावा चित्रपट आहे आणि मी पुढेही त्यांच्या चित्रपटात काम करत राहिल, मला तुमच्या शुभेच्छाची आवश्यक्ता आहे आणि मी कसा दिसत आहे हे सांगा.

View this post on Instagram

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

‘बच्चन पांडे’ या चित्रपटात अक्षय कुमार आणि कृती सैनन (Kriti Sanon) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय अरशद वारसी, जॅकलिन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी हे स्टारही या चित्रपटात दिसणार आहेत.‘बच्चन पांडे’ हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन फरहाद सामजी करणार आहेत. पंकज त्रिपाठी ‘सुपर 30′ आणि ’83’ नंतर आता बच्चन पांडेमध्ये तिसऱ्यांदा साजिद नाडियाडवालासोबत काम करणार आहे. अक्षय कुमार आणि पंकज त्रिपाठी हे प्रथमच एकत्र स्क्रीन स्पेस शेअर करणार आहेत.

अक्षय कुमारचा  ‘बच्चन पांडे’ चित्रपटातील नवा लूक पाहून सर्वत्र त्याच्या लूक बद्दल चर्चा सुरु आहे.

संबंधित बातम्या : 

संजय दत्तची पत्नी मान्यताचा जबराट फोटो, मुलगी त्रिशालाची भन्नाट कॉमेंट!

Trick | दिलजीत आणि उर्मिलाच्या भांडणात कंगनाचा फायदा, ट्विटरवर वाढले इतके फॉलोअर्स

(Akshay Kumar has started shooting for his upcoming Bachchan Pandey film)

Published On - 12:59 pm, Thu, 7 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI