Bachchan Pandey : अखेर…चाहत्यांची आतुरता संपली, अक्षय कुमारचा ‘बच्चन पांडे’ चित्रपट या तारखेला होतोय रिलीज!

Bachchan Pandey : अखेर...चाहत्यांची आतुरता संपली, अक्षय कुमारचा 'बच्चन पांडे' चित्रपट या तारखेला होतोय रिलीज!
अक्षय कुमार

अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चाहत्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. अक्षय कुमारचा चित्रपट 'बच्चन पांडे' (Bachchan Pandey) ज्याची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होते. त्या चित्रपटाची तारीख रिलीज करण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 10:41 AM

मुंबई : अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) चाहत्यांसाठी एक अत्यंत मोठी बातमी आहे. अक्षय कुमारचा चित्रपट ‘बच्चन पांडे’ (Bachchan Pandey) ज्याची चाहते गेल्या अनेक दिवसांपासून आतुरतेने वाट पाहात होते. त्या चित्रपटाची तारीख रिलीज करण्यात आली आहे. इतकेच नव्हेतर चाहत्यांना हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये जाऊन पाहण्याची संधी देखील मिळणार आहे. सध्या देशामध्ये कोरोनाच्या केसमध्ये वाढ होत आहे. मात्र, हळूहळू स्थिती नियंत्रणात येण्याची शक्यता आहे.

बच्चन पांडे चित्रपट या तारखेला होणार रिलीज

अक्षय कुमारचा बहुचर्चित चित्रपट बच्चन पांडे हा मार्च महिन्यात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अक्षयने त्याच्या इंस्टाग्रामवर बच्चन पांडे या चित्रपटाचे नवीन पोस्टर रिलीज करत आपल्या चाहत्यांना याची माहीती दिली आहे. यासोबतच अक्षयने चाहत्यांना चित्रपटाची रिलीज डेटही सांगितली आहे. अक्षय कुमार स्टारर चित्रपट बच्चन पांडे 4 मार्चला रिलीज होणार होता. मात्र, आता हा चित्रपट 18 मार्च रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट होळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ‘बच्चन पांडे’मध्ये अक्षय कुमारसोबतच जॅकलिन फर्नांडिसही या चित्रपटात दिसणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Akshay Kumar (@akshaykumar)

अक्षय कुमारने शेअर केलेल्या बच्चन पांडेच्या पोस्टरमध्ये अक्षय एका खास स्टाईलमध्ये दिसत आहे. कपाळावर कुंकू, पाठीवर बंदूक आणि डोळ्यांवर काळा चष्मा घातलेला दिसत आहे. अक्षयचे हा लूक चाहत्यांना प्रचंड आवडला आहे. हे पोस्टर शेअर करताना अक्षयने लिहिले की, ‘अॅक्शन, कॉमेडी, रोमान्स, ड्रामा’ हे सर्व प्रेक्षकांना चित्रपटामध्ये मिळणार आहे. अक्षयने त्याच्या पोस्टरच्या कॅप्शनमध्ये लिहिले- ‘लोडिंग दिस होळी.’ याशिवाय चित्रपटाचे एक पोस्टर समोर आले आहे. ज्यामध्ये अक्षय जीपच्या बोनेटवर बसून त्याच्या टीमसोबत दिसत आहे. अक्षयच्या चित्रपटाच्या या पोस्टर्सना चांगला प्रतिसाद मिळत आहे.

संबंधित बातम्या : 

ACP Pradyuman : काय सांगता…? CID मालिकेतील एसीपी प्रद्युम्न कामाच्या शोधात, वाचा नेमकं काय घडलं?

Varun Dhawan : वरुण धवनवर दुखाचा डोंगर… अनेक वर्ष सोबत असलेल्या विश्वासू व्यक्तीचा मृत्यू!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें