Varun Dhawan : वरुण धवनवर दुखाचा डोंगर… अनेक वर्ष सोबत असलेल्या विश्वासू व्यक्तीचा मृत्यू!

Varun Dhawan : वरुण धवनवर दुखाचा डोंगर... अनेक वर्ष सोबत असलेल्या विश्वासू व्यक्तीचा मृत्यू!
वरूण धवनवर दुखाचा डोंगर

बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच सर्वांसोबत आदराने वागतो. मात्र, सध्या वरुण दुःखी आहे. वरुणच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. मंगळवारी वरुणच्या ड्रायव्हरचे निधन (Driver Manoj) झाले आहे

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 19, 2022 | 9:08 AM

मुंबई : बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) नेहमीच चर्चेत असतो. तो नेहमीच सर्वांसोबत आदराने वागतो. मात्र, सध्या वरुण दुःखी आहे. वरुणच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीचे निधन झाले आहे. मंगळवारी वरुणच्या ड्रायव्हरचे निधन (Driver Manoj) झाले आहे. तुम्ही म्हणालं की, ड्रायव्हर कसं काय जवळचा व्यक्ती? परंतू वरुणचे ड्रायव्हर मनोज हे 15 वर्षांचे असल्यापासून धवन कुटुंबासोबत काम करत आहेत.

अगोदर डेविड धवन यांच्यासाठी केले काम

ड्रायव्हर मनोज हे अगोदर वरूणचे वडिल यांच्यासाठी काम करायचे. यामुळे धवन कुटुंबाचे एक सदस्यच मनोज हे होते. यामुळे मनोज यांच्या अशा अचानक जाण्यामुळे धवन कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. मनोज यांचा मुंबईतील लीलावती रुग्णालयात मृत्यू झाला आहे. रिपोर्ट्सनुसार मनोज मेहबूब स्टुडिओमध्ये होते. जिथे वरुण धवन देखील होता. मनोज यांना सेटवरच छातीत दुखू लागले आणि त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. चित्रपटाचे शूटिंग करत असलेल्या वरुणला याची माहिती मिळताच त्याने तात्काळ लीलावती हॉस्पिटलकडे धाव घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Gossip Girl💋👑 (@bolly_newzz)

वरुण धवनवर दुखाचा डोंगर 

ही बातमी ऐकून धवन कुटुंब खूप दुःखी असल्याचं बोलले जात आहे. विशेष म्हणजे धवन कुटुंबीय मनोज यांच्या कुटुंबाच्या संपर्कात आहेत आणि त्यांना सर्वतोपरी मदत करत आहेत. विशेष म्हणजे अभिनेता वरुणने स्वत: हॉस्पिटलमधील सर्व औपचारिकता पूर्ण केली. रुग्णालयातील वरुणचे फोटोही समोर आले आहेत. वरुणने मास्क घातला असला तरी त्याच्या डोळ्यात दुःख स्पष्टपणे दिसत आहे.

संबंधित बातम्या : 

ACP Pradyuman : काय सांगता…? CID मालिकेतील एसीपी प्रद्युम्न कामाच्या शोधात, वाचा नेमकं काय घडलं?

Dhanush Aishwarya Divorce : धनुषने ऐश्वर्यापासून वेगळं होताच ऐश्वर्याची बहिण सौंदर्याची काय होती प्रतिक्रिया, जाणून घ्या!


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें