Allu Arjun: अल्लू अर्जुनची सलमान खानला टक्कर; ‘पुष्पा 2’साठी घेतलं तगडं मानधन

पुष्पा 1 नंतर प्रेक्षकांमध्ये पुष्पा 2 ची प्रचंड उत्सुकता आहे. सीक्वेलमध्येही अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मानधनात वाढ केल्याचं समजतंय.

Allu Arjun: अल्लू अर्जुनची सलमान खानला टक्कर; 'पुष्पा 2'साठी घेतलं तगडं मानधन
Allu Arjun: अल्लू अर्जुनची सलमान खानला टक्कर
Image Credit source: Instagram
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Sep 07, 2022 | 6:39 PM

‘पुष्पा: राइज’ या चित्रपटानंतर स्टायलिश स्टार अल्लू अर्जुनची (Allu Arjun) देशभरात लोकप्रियता प्रचंड वाढली. अल्लू अर्जुन हे नाव फक्त दक्षिणेतच नाही तर बॉलिवूडमध्येही चर्चेत आलं. आता या चित्रपटाचा दुसरा भाग ‘पुष्पा: द रुल’ (Pushpa: The Rule) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सीक्वेलच्या शूटिंगची सुरुवात झाली. या चित्रपटासाठी अल्लू अर्जुनने तगडं मानधन घेतल्याचं कळतंय. या मानधनावरून आता त्याची तुलना बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानशी (Salman Khan) केली जातेय.

पुष्पा 1 नंतर प्रेक्षकांमध्ये पुष्पा 2 ची प्रचंड उत्सुकता आहे. सीक्वेलमध्येही अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. पुष्पाच्या यशानंतर अल्लू अर्जुनने त्याच्या मानधनात वाढ केल्याचं समजतंय. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्याने तब्बल 125 कोटी रुपयांचं मानधन घेतल्याची माहिती समोर येत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Allu Arjun (@alluarjunonline)

अल्लू अर्जुनच्या मानधनाचा आकडा पाहून त्याची तुलना बॉलिवूड स्टार सलमान खानशी केली जातेय. त्याचप्रमाणे पुष्पा 2 चा बजेट हा 450 कोटींचा असल्याचं म्हटलं जात आहे. सीक्वेलमध्येही प्रेक्षकांना ॲक्शनचा जबरदस्त तडका पहायला मिळणार आहे. ‘पुष्पा: द राईज’ या चित्रपटाने जगभरात तब्बल 300 कोटींचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाची क्रेझ देशभरात पहायला मिळाली. यातील समंथा रुथ प्रभूचा ‘ऊ अंटावा’ हे गाणंसुद्धा तुफान गाजलं.

सलमानने त्याच्या आगामी चित्रपटासाठी जवळपास 125 कोटी रुपये मानधन घेतल्याची याआधी चर्चा होती. पुष्पाच्या सीक्वेलसोबतच प्रेक्षकांमध्ये सलमानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाविषयीही प्रचंड उत्सुकता आहे. नुकताच सलमानचा या चित्रपटातील लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें