बहुचर्चित ‘ड्रीम गर्ल 2’ चित्रपटामध्ये काम करण्याची संधी ‘या’ मोठ्या अभिनेत्याच्या मुलीला अखेर मिळाली, वाचा नेमके काय घडले?

शितल मुंडे, Tv9 मराठी

Updated on: Sep 17, 2022 | 10:06 AM

अनन्या पांडेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, आयुष्मान खुराना मथुरेत आलांय. बाॅलिवूडचे चित्रपट चालत नसल्याने तो पूजा करण्यासाठी मथुरेत गेल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ईदच्या दिवशी पूजा करू, असे आयुष्यान बोलतो आहे.

बहुचर्चित 'ड्रीम गर्ल 2' चित्रपटामध्ये काम करण्याची संधी 'या' मोठ्या अभिनेत्याच्या मुलीला अखेर मिळाली, वाचा नेमके काय घडले?

मुंबई : ड्रीम गर्ल 2 (Dream Girl 2) चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चा सुरू आहे. ड्रीम गर्ल हा 2019 चा हिट चित्रपट होता, यामध्ये आयुष्मान खुरानासोबत (Ayushmann Khurrana) नुसरत भरुचा महत्वाच्या भूमिकेत होती. आता ड्रीम गर्ल 2 चाहत्यांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता दिसते आहे. आयुष्मान खुराना अगोदरपासूनच ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये (Movie) काम करणार असल्याचे स्पष्ट होते, मात्र नुसरतच्या जागी निर्माते वेगळ्या नावाचा विचार करत होते. ड्रीम गर्ल 2 मध्ये आयुष्मानसोबत परिणीती चोप्रा, खुशी कपूर आणि बिग बाॅस फेम तेजस्वी प्रकाश यांच्या नावाची चर्चा होती.

इथे पाहा अनन्या पांडेने शेअर केलेली पोस्ट

ड्रीम गर्ल 2 चित्रपटामध्ये या मोठ्या अभिनेत्याची मुलगी दिसणार

अखेर आयुष्मान खुरानाला त्याची ड्रीम गर्ल मिळालीये. परिणीती चोप्रा, खुशी कपूर, तेजस्वी प्रकाश यापैकी कोणालाच संधी न मिळता. चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेला ड्रीम गर्ल 2 मध्ये काम करण्याची संधी मिळालीये. अनन्या पांडेने याची माहिती इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबत शेअर करत एक खास व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर केलांय. ड्रीम गर्ल 2 या चित्रपटात आयुष्मान खुरानासोबत मनोज जोशी, विजय राज, अन्नू कपूर, परेश रावल, राजपाल यादव आणि सीमा पाहवा दिसणार आहेत.

हे सुद्धा वाचा

ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार ड्रीम गर्ल 2

अनन्या पांडेने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसते आहे की, आयुष्मान खुराना मथुरेत आलांय. बाॅलिवूडचे चित्रपट चालत नसल्याने तो पूजा करण्यासाठी मथुरेत गेल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी ईदच्या दिवशी पूजा करू, असे आयुष्यान बोलतो आहे. त्यानंतर चित्रपटातील कलाकरांचे फोटो येतात. शेवटी अनन्या पांडे या व्हिडीओमध्ये दिसते आहे. आयुष्यान खुराणा आणि अनन्या पांडेचा हा चित्रपट 29 जून 2023 ला ईदच्या दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI