‘तुझा आणि सुशांतचा फोटो पाठव’, फॅन्सची मागणी, त्यावर अंकिता लोखंडेने पाठवला ‘तो’ फोटो…

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) राजपूत काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 18:36 PM, 26 Jan 2021
'तुझा आणि सुशांतचा फोटो पाठव', फॅन्सची मागणी, त्यावर अंकिता लोखंडेने पाठवला 'तो' फोटो...

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lonkhande) सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांच्या कनेक्टमध्ये असते. ती काय करते?, तिचं शेड्युल कसं असतं? या पुढचे अपकमिंग प्रोग्राम काय आहेत? याची माहिती ती आपल्या फॅन्सला सोशल मीडियावरुन देत असते. याचदरम्यान चाहत्यांशी इंट्रॅक्शन करत असताना एका चाहत्याने तिला सुशांतबरोबरचा एक फोटो पाठवायला सांगितला. तिनेही सुशांतच्या पाटन्याच्या घरी क्लिक केलेला एक छानसा फोटो फॅन्सला पाठवला.( Ankita Lonkhande Shares A photo With Sushant Singh Rajput)

sushant singh rajput

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)काही वर्ष रिलेशनशीपमध्ये होते. एका टीव्ही सिरियलमध्ये त्यांची ओळख झाली. पुढे ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रुपांचर प्रेमात झालं. मग गाठीभेटी वाढल्या साहजिकच एकमेकांच्या घरी जाणं येणं झालं. काही वर्षांपूर्वी अंकिता सुशांतच्या पाटन्याच्या घरी गेली होती. यावेळी तिथे सुशांतचे सगळे कुटुंबीय होते. त्यांच्या कुटुंबीयांनाही अंकिता आणि सुशांतच्या नात्याची कल्पना होती.

फोटो शेअर करण्याच्या एक छानसं सेशन तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ठेवलं. साहजिकच अनेक फॅन्सनी तिच्याकडे अनेक फोटोंची मागणी केली. मग तिच्या फॅमिलीमधील आई-बाबांच्या फोटोपासून ते बॉयफ्रेंड विकी जैनपर्यंतच्या फोटोंची मागणी चाहत्यांनी केली. अशात एका चाहत्याने सुशांतबरोबरचा एक फोटो तिला शेअर करायला सांगितला. त्यावर तिने खूप वर्षांपूर्वीचा सुशांतच्या घरी काढलेला एक फोटो शेअर केला. यामध्ये ती, सुशांत आणि सुशांतचे कुटुंबीय दिसत आहेत. तिने शेअर केलेल्या फोटोवरुन तिचं आणि सुशांतच्या कुटुंबीयांचं बॉन्डिंग खूप छान असल्याचं दिसून येतंय.

अंकिताच्या सोशल मीडियावर ट्रोलर्सची धाड

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर अंकिता अनेक वेळा ट्रोल झाली आहे. तिने कुठलाही फोटो शेअर केला की सुशांतचे फॅन्स तिला ट्रोल करत असतात. त्याच्या मृत्यूला अंकिताच जबाबदार आहे, असा दावा करत सुशांतचे फॅन्स अंकिताला ट्रोल करतात. मात्र अंकितानेही अनेक वेळा त्यांना तोडीस तोड प्रत्युत्तर दिलंय.

संबंधित बातम्या : 

Unseen Roka Photos | रोका सेरेमनीचे वरुण-नताशाचे फोटो पाहून, चाहते म्हणाले, ‘व्वा क्या बात है…’

शेतकरी आंदोलनाचा विरोध करणं कंगनाला महागात, 6 ब्रॅंडने रद्द केली कॉन्ट्रॅक्ट!

(Ankita Lonkhande Shares A photo With Sushant Singh Rajput)