Anupam Kher: अनुपम खेर यांचा दिग्दर्शक-निर्मात्यांशी वाद; अखेर ट्विटरवर नेटकऱ्यांकडून मागितला सल्ला

'द काश्मीर फाईल्स'नंतर (The Kashmir Files) ते सध्या एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहेत. याबाबत त्यांनी ट्विटही केलं आहे. या चित्रपटासंदर्भात त्यांनी नेटकऱ्यांचंही मत विचारलंय.

Anupam Kher: अनुपम खेर यांचा दिग्दर्शक-निर्मात्यांशी वाद; अखेर ट्विटरवर नेटकऱ्यांकडून मागितला सल्ला
Anupam Kher
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 05, 2022 | 10:38 AM

बॉलिवूडमधील (Bollywood) ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हे सोशल मीडियावर बरेच सक्रिय असतात. ते कधी त्यांची आई दुलारी देवी यांचे व्हिडिओ शेअर करतात तर कधी चाहत्यांशी संवाद साधताना दिसताच. चित्रपटांमध्येही ते आपल्या दमदार भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडतात. ‘द काश्मीर फाईल्स’नंतर (The Kashmir Files) ते सध्या एका नवीन प्रोजेक्टवर काम करत आहेत. याबाबत त्यांनी ट्विटही केलं आहे. या चित्रपटासंदर्भात त्यांनी नेटकऱ्यांचंही मत विचारलंय. या चित्रपटातील एका विषयावरून त्यांचे दिग्दर्शक आणि निर्मात्यांशी वाद सुरू आहेत. यात माझी मदत करा, अशी विनंती त्यांनी नेटकऱ्यांना केली आहे.

अनुपम खेर यांनी ट्विटरवर लिहिलं, ‘आज मी माझ्या करिअरमधील 525 व्या प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात करणार आहे. सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत ही अतिशय सुंदर कथा आहे. या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल आमचे आदरणीय निर्माते, दिग्दर्शक आणि माझ्यात थोडा वाद सुरू आहे. म्हणून आम्ही ठरवलंय की तुम्हालाच याबद्दल विचारुया.’ या ट्विटमध्ये त्यांनी नेटकऱ्यांना चार पर्याय दिले. ‘द लास्ट सिग्नेचर’, ‘सार्थक’, ‘निर्णय’ आणि ‘दस्तखत’ असे चार पर्याय त्यांनी दिले आहेत.

अनुपम खेर यांचं ट्विट-

या चार पर्यायांपैकी एक नेटकऱ्यांना निवडायचं होतं. चाहत्यांनी त्यावर मत व्यक्त करताना काही मजेदार गोष्टीही लिहिल्या आहेत. ‘जिसकी भैंस उसकी लाठी, तुम्ही कोणतेही शीर्षक ठेवा, तुमचा चित्रपट सुपरडुपर हिट होणारच,’ असं एकाने म्हटलं. तर ‘सार्थक आणि निर्णय ही नावं आवडली नाहीत. अशा नावांचा चित्रपट पाहायला फारसे प्रेक्षक येणार नाहीत. दस्तखत हे नाव ठीक आहे. पण द लास्ट सिग्नेचर सर्वांत चांगलं आहे,’ असं दुसऱ्या युजरने लिहिलं. चित्रपटाची कथा माहित नसताना त्याचं शीर्षक कसं सुचवावं असाही प्रश्न काहींनी विचारला.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

अनुपम खेर यांनी दिलेल्या चार पर्यायांपैकी ‘द लास्ट सिग्नेचर’ला सर्वाधिक 34.9 टक्के मतं मिळाली आहेत. त्यानंतर सार्थक आणि दस्तखत या नावांना नेटकऱ्यांनी पसंती दिली. या दोन नावांच्या मतांमध्ये फक्त थोडाच फरक आहे. सार्थक या नावाला 25.1 टक्के तर दस्तखत या नावाला 25 टक्के मतं मिळाली. सर्वांत कमी मतं निर्णय या नावाला मिळाली. 14.9 टक्के मतं या नावाला मिळाली.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें