Aryan Khan Drug Case : आधी शाहरुख, आता गौरी खान लेक आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan khan) गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. अलीकडेच शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता.

Aryan Khan Drug Case : आधी शाहरुख, आता गौरी खान लेक आर्यनला भेटायला आर्थर रोड जेलमध्ये!
Aryan-Gauri
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 1:44 PM

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (Aryan khan) गेल्या अनेक दिवसांपासून तुरुंगात आहे. ड्रग्ज प्रकरणात अटक झालेला आर्यन सध्या आर्थर रोड कारागृहात आहे. अलीकडेच शाहरुख खान आपल्या मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात गेला होता. आता शाहरुखनंतर गौरी खान तिचा मुलगा आर्यनला भेटणार आहे.

गौरीला आर्यनची खूप काळजी वाटते आहे. म्हणूनच ती आपल्या मुलाला भेटणार आहे. गेल्या आठवड्यात शाहरुख खान देखील तुरुंगात आपल्या मुलाला भेटायला आला होता. आर्यन खान सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. न्यायालयाने त्याच्या कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे.

इंटरकॉमवर झाले संभाषण

शाहरुख खान 21 ऑक्टोबरला आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड जेलमध्ये गेला होता. जिथे त्याने आर्यनशी 16-18 मिनिटे चर्चा केली. संभाषणादरम्यान शाहरुख आणि आर्यन यांच्यामध्ये काचेची भिंत उपस्थित होती. यासोबत तुरुंग अधिकारीही उपस्थित होते. दोघांचे इंटरकॉमवरून बोलणे झाले होते.

जामीन अर्ज फेटाळला

आर्यनला ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने अटक केली होती. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर छापा टाकून एनसीबीने आर्यनसह आठ जणांना अटक केली. तसेच मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले. आर्यनचा जामीन अर्ज दंडाधिकारी न्यायालय आणि सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. आता त्याच्या वकिलाने जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

ड्रग्स प्रकरणात अडकलेल्या आर्यन खानच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये अनन्या पांडेचे नाव समोर आले आहे. गप्पांमध्ये दोघे ड्रग्जबद्दल बोलताना दिसतात. त्यानंतर एनसीबी अनन्या पांडेची चौकशी करत आहे. एनसीबीने अनन्याला समन्स पाठवले होते, त्यानंतर सलग 2 दिवस तिची चौकशी करण्यात आली. आज (25 ऑक्टोबर) पुन्हा अनन्याला चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आले आहे.

अनन्याची चौकशी होणार!

अनन्या पांडे ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या तावडीत अडकली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, “मी व्यवस्था करीन”, असं चॅटमध्ये समोर आलंय.

ड्रग्स चॅटवर अनन्याने एनसीबीला काय उत्तर दिले?

एनसीबीने अनन्याला हे चॅट दाखवले आणि काही प्रश्न विचारले, ज्यावर अनन्या म्हणाली की, ती फक्त विनोद करत होती. अनन्या पांडेने एनसीबीच्या अधिकाऱ्यांना सांगितले की आर्यनशी तिच्या गप्पा ड्रग्सबद्दल नाही तर सिगारेटबद्दलच्या आहेत. दोघांमध्ये सिगारेटबद्दल संभाषण झाले होते. अनन्याने सांगितले की, तिने कधीही ड्रग्जचे सेवन केले नाही.

एनसीबीच्या मते, आतापर्यंत असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत की अनन्याने आर्यनसाठी कधीच कोणत्याही ड्रग्जची व्यवस्था केली आहे. मात्र, आर्यन-अनन्या यांनी ड्रग्जबाबत एकदा नव्हे, तर अनेक वेळा संभाषण केले आहे.

हेही वाचा :

67th National Film Awards : रजनीकांत यांचा ‘दादासाहेब फाळके’ पुरस्काराने सन्मान, पाहा पुरस्कारांचे मानकरी…

Bunty Aur Babli 2 Trailer : ‘बंटी’ आणि ‘बबली’चा डबल धमाका, राणी-सैफसह सिद्धांत चतुर्वेदी आणि शर्वरी वाघ दिसणार मुख्य भूमिकेत!

Non Stop LIVE Update
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी
हातकणंगलेत धैर्यशील माने यांची वाट बिकट, भाजपा कार्यकर्त्यांची नाराजी.
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड
काँग्रेस पक्षाला आयकरकडून नवी नोटीस, इतक्या कोटींचा ठोठावला दंड.
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.