Bell Bottom Review : अक्षय कुमारचा हिट परफॉर्मन्स, लारा दत्ता आणि आदिल हुसैनच्या अभिनयाची वाहवा

Bel Bottom Review | नवी दिल्लीहून श्रीनगरला जाणारे एक विमान दहशतवाद्यांकडून हायजॅक केले जाते. त्यानंतर दहशतवाद्यांकडून हे विमान अमृतसर विमानतळावर उतरवले जाते. विमान हायजॅक झाल्याचे कळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावतात.

Bell Bottom Review : अक्षय कुमारचा हिट परफॉर्मन्स, लारा दत्ता आणि आदिल हुसैनच्या अभिनयाची वाहवा
बेल बॉटम

मुंबई: अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘बेल बॉटम’ (Bell Bottom) हा चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमारचा आणखी एक देशभक्तीपर चित्रपट म्हणून प्रदशर्नापूर्वीपासूनच ‘बेल बॉटमची’ (Bel Bottom) प्रचंड चर्चा सुरु होती. रंजीत तिवारी यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटातील अभिनय आणि रंजक कथानक जमेच्या बाजू ठरतात. या चित्रपटाची कथा 1984 मधील एका विमान अपहरणाच्या घटनेवर आधारित आहे.

नवी दिल्लीहून श्रीनगरला जाणारे एक विमान दहशतवाद्यांकडून हायजॅक केले जाते. त्यानंतर दहशतवाद्यांकडून हे विमान अमृतसर विमानतळावर उतरवले जाते. विमान हायजॅक झाल्याचे कळाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावतात. यावेळी ‘रॉ’च्या अधिकाऱ्याची भूमिका साकारणाऱ्या आदिल हुसैन यांच्याकडून या कामगिरीसाठी अंशुल मल्होत्रा (अक्षय कुमार) या अधिकाऱ्याची निवड केली जाते. अंशुल मल्होत्राचे कोड नेम बेल बॉटम असे आहे.

यानंतर चित्रपटात अंशुल मल्होत्रा अपहरण झालेल्या प्रवाशांची कशाप्रकारे सुटका करतो, याचा थरारक प्रवास पाहायला मिळतो. या चित्रपटात थरात आणि फॅमिली ड्रामा असे दोन प्लॉट समांतररित्या सुरु असताना दिसतात. या चित्रपटात अक्षय कुमारसह आदिल हुसैन, हुमा कुरेशी, लारा दत्ता, वाणी कपूर, हुमा कुरेशी आणि अनिरुद्ध दवे या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. इंदिरा गांधी यांच्या भूमिकेतील लारा दत्ताच्या लूकने यापूर्वीच सर्वांची वाहवा मिळवली होती. तिचा अभिनयही तितक्याचा ताकदीचा झाल्यामुळे ही भूमिका प्रेक्षकांवर छाप पाडून जाते.

तर या चित्रपटात अंशुम मल्होत्राच्या मेंटरच्या भूमिकेत असलेल्या आदिल हुसैन यांनीही नेहमीप्रमाणे दमदार अभिनय केला आहे. या संपूर्ण मोहीमेची आखणी आदिल हुसैन यांच्या पात्राने केली असल्यामुळे संपूर्ण चित्रपटात त्यांचा सातत्याने वावर आहे. वाणी कपूरनेही तिच्या वाट्याला आलेली अंशुम मल्होत्राच्या पत्नीची भूमिका व्यवस्थितपणे पार पाडली आहे. तर अक्षय कुमारनेही आपल्या लौकिकाला साजेसा अभिनय केला आहे. काही सीनमध्ये मात्र अक्षय कुमार वाहवत गेल्यासारखा वाटतो. मात्र, अक्षय कुमारचा एकूण अभिनय उत्तम आहे. याशिवाय, वाणी कपूरच्या भूमिकेमुळे चित्रपटाच्या शेवटी आलेला ट्विस्टही पाहण्यासारखा आहे.

बेल बॉटम का पहावा?

बेल बॉटम हा चित्रपट अक्षय कुमारच्या इतर देशभक्तीपर चित्रपटांप्रमाणे नाही. या चित्रपटात इतर पात्रांच्या भूमिकाही तितक्याच दमदार आहेत. उलट अक्षय कुमारने या चित्रपटात काहीसा अंडर प्ले केल्याचे दिसते. क्लायमेक्स सीनमधील सिनेमॅटोग्राफी लक्षवेधक आहे. तसेच कथानक रंजक राहील आणि हाताबाहेर जाणार नाही याची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. अक्षय कुमार आणि आदिल हुसैन यांच्यातील अभिनयाची जुगलबंदीही चांगलीच रंगली आहे. मात्र, लारा दत्ताने साकारलेल्या इंदिरा गांधी यांच्या भूमिकेने सर्वाधिक वाहवा मिळवली आहे. ही भूमिका लाराच्या कारकीर्दीला नवी उभारी मिळवून देणारी ठरू शकते.

चित्रपटातील उणीवा?

चित्रपटाच्या पूर्वाधात घटना खूपच वेगाने घडतात. त्यामुळे कथानकाचा ट्रॅक प्रेक्षकांच्या लक्षात न राहण्याची भीती आहे. चित्रपटाचा क्लायमेक्स आणखी रंगवता आला असता. उत्तरार्धातील घटनांच्या तुलनेत क्लायमेक्स फिका वाटतो. आदिल हुसैन यांनी रंगविलेले पात्र दमदार असतानाही त्यांच्या तोंडी देण्यात आलेले काही संवाद आक्षेपार्ह वाटतात. तसेच चित्रपटातील अक्षय कुमार आणि वाणी कपूरचा फॅमिली ड्रामा कथानकापासून लक्ष विचलित करताना दिसतो. हा चित्रपट पाहताना तितकासा थरार जाणवत नाही.

कलाकार- अक्षय कुमार, वाणी कपूर, लारा दत्ता, आदिल हुसैन, हुमा कुरेशी आणि अनिरुद्ध दवे
दिग्दर्शक- रंजीत तिवारी
रेटिंग-3.5

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI