AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | चित्रपट फ्लाॅप जात असताना शाहरुख खान बाॅलिवूडला देणार होता सोडचिठ्ठी, या व्यवसायामध्ये जाण्याची पूर्ण तयारी….

शाहरुख खान याचे चाहते त्याच्या याच पुनरागमनाची वाट पाहात होते. पठाण चित्रपटाची मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे.

Shah Rukh Khan | चित्रपट फ्लाॅप जात असताना शाहरुख खान बाॅलिवूडला देणार होता सोडचिठ्ठी, या व्यवसायामध्ये जाण्याची पूर्ण तयारी....
| Updated on: Jan 30, 2023 | 7:08 PM
Share

मुंबई : शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर सुसाट कामगिरी करताना दिसत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांमध्ये जगभरातून तब्बल 550 कोटींचे जबरदस्त असे बाॅक्स आॅफिस कलेक्शन केले. विशेष म्हणजे पठाण हा शाहरुख खान (Shah Rukh Khan)  याच्या करिअरमधील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पाच दिवसांमध्येच शाहरुख खान याचा चित्रपट (Movie) हा बाॅलिवूडच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या दहा चित्रपटांच्या यादीमध्ये समाविष्ट झालाय. पुढील काही दिवस चित्रपट अजून काही रेकाॅर्ड हे आपल्या नावावर करू शकतो. २०१९ मध्ये शाहरुख खान याचा झिरो हा शेवटचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फ्लाॅप गेला. यानंतर अनेकांनी शाहरुख खान याच्यावर टीका करत आता शाहरुख खान याच्या अभिनयाची जादू राहिली नसल्याचे म्हटले होते. झिरोनंतर तब्बल चार वर्षांनंतर पठाण चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख खान याने पुनरागमन केले आहे.

शाहरुख खान याचे चाहते त्याच्या याच पुनरागमनाची वाट पाहात होते. पठाण चित्रपटाची मोठी क्रेझ चाहत्यांमध्ये बघायला मिळत आहे. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याने जबरदस्त असा अभिनय केलायं.

विशेष म्हणजे पठाण चित्रपटामध्ये फक्त शाहरुख खान याचाच अभिनय नाहीतर सलमान खान याची झलक देखील बघायला मिळत आहे. पठाण याला वाचवण्यासाठी सलमान खान हा धावून आल्याचे चित्रपटात दिसत आहेत.

चित्रपट रिलीज होऊन पाच दिवस झाले असताना चित्रपटाने जगभरातून 550 कोटींहून अधिक कमाई केली आहे. पुढील काही दिवसांमध्ये 1000 कोटींचा आकडा पठाण चित्रपट पार करू शकतो.

विशेष म्हणजे पठाण चित्रपट हा बाॅलिवूडचा सर्वाधिक ओपनिंग कलेक्शन करणारा चित्रपट ठरला आहे. पठाण चित्रपटाची चाहत्यांमध्ये इतकी जास्त क्रेझ बघायला मिळत आहे की, एक चाहता चित्रपट पाहण्यासाठी थेट बिहारवरून पश्चिम बंगालमध्ये पोहचला होता.

शाहरुख खान याने नुकताच मीडियासोबत बोलताना एक धक्कादायक खुलासा करत म्हटले की, चित्रपट सतत फ्लाॅप जात असताना मी हे करिअर सोडून इतर क्षेत्रामध्ये काम करण्याचा विचार केला होता.

शाहरुख खान पुढे म्हणाला माझे चित्रपट फ्लाॅप जात होते, त्यावेळी मी स्वयंपाक बनवायला शिकलो. मी त्यावेळी हाॅटेल सुरू करण्याचाही विचार केला होता. यादरम्यान शाहरुख खान याने इटालियन पदार्थ बनवायला देखील शिकले.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.