Karisma Kapoor Net worth | चित्रपटांपासून दूर असूनही करिश्मा कपूर कमावते करोडो रुपये!

कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही 90च्या दशकाची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिश्माने तिच्या सौंदर्याने आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करिश्माने 1991 साली ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती.

Karisma Kapoor Net worth | चित्रपटांपासून दूर असूनही करिश्मा कपूर कमावते करोडो रुपये!
करिश्मा कपूर

मुंबई : कपूर घराण्याची लाडकी लेक करिश्मा कपूर (Karisma Kapoor) ही 90च्या दशकाची सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. करिश्माने तिच्या सौंदर्याने आणि जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. करिश्माने 1991 साली ‘प्रेम कैदी’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली होती. पहिल्या चित्रपटातून धमाका केल्यानंतर, करिश्माने पुन्हा एकामागून एक अनेक चित्रपटांत काम केले. करिश्मा तिच्या काळात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती (Bollywood Actress Karisma Kapoor Networth).

तथापि, मुले आणि कुटुंबीयांमध्ये व्यस्त झाल्यानंतर करिश्माने स्वत:ला चित्रपटांपासून दूर केले होते. त्यानंतर बर्‍याच वर्षांच्या विश्रांतीनंतर तिने मनोरंजन विश्वात पुनरागमन केले होते, पण यावेळी तिची जादू पूर्वीसारखे काम करू शकली नाही. जरी करिश्मा आता चित्रपटांपासून दूर असली, तरी याचा तिच्या कमाईवर परिणाम झाला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, करिश्मा अजूनही कोट्यवधींची कमाई करते. यासह तिच्याकडे अनेक लक्झरी वाहनांचा संग्रहही आहे.

करिश्मा कपूरचा नेट वर्थ

नेटवर्थ डॉलर्समध्ये : 12 मिलियन डॉलर्स

नेटवर्थ कोटींमध्ये : 87 कोटी

नेटवर्थ लाखांमध्ये : 8700 लाख

उत्पन्नाचा स्रोत

अभिनय आणि जाहिरात

कार कलेक्शन

– मर्सिडीज-बेंझ एस-वर्ग

– लेक्सस एलएक्स 470

– मर्सिडीज बेंझ ई क्लास

– बीएमडब्ल्यू 7 सीरीज

– ऑडी Q7

करिश्माचे पुरागमन

शेवट 2020मध्ये करिश्मा ‘मेंटलहुड’ या वेब सीरीजमध्ये दिसली होती. या मालिकेत आईच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या गेल्या होत्या. मात्र, करिश्मा सोडून त्यामध्ये बरेच कलाकार होते. ही मालिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली आणि करिश्माने त्याद्वारे तिचा डिजिटल डेब्यू केला होता.

सध्या करिश्माने कोणत्याही आगामी प्रकल्पांची घोषणा केलेली नाही. मात्र, ती जाहिरातींमध्ये दिसते. सध्या करिश्मा तिच्या कुटुंबासमवेत वेळ घालवत आहे आणि सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे. तिने आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

तसेच, अनेक बॉलिवूड इव्हेंटमध्येही करिश्मा बघायला मिळते. याशिवाय ती बहिण करीना कपूरसोबत पार्टी करत असते, ज्याचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत असतात.

(Bollywood Actress Karisma Kapoor Networth)

हेही वाचा :

Madhuri Dixit : धकधक गर्लची घायाळ करणारी अदा, सोशल मीडियावर फोटो शेअर

Rakhi Sawant : बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री घेण्यासाठी राखी उत्सुक, म्हणाली यावेळी पती रितेशसोबत यायची इच्छा…

कोरोनाशी झुंज यशस्वी, तब्बल 55 दिवसांनी अभिनेता अनिरुद्ध दवे घरी परतला!

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI