Box office collection : ‘RRR’ चित्रपटाचा बॉक्सवर धमाका सुरूच…, जॉनच्या अटॅकची इतके कोटींची कमाई!

RRR चित्रपट (RRR Movie) बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करताना दिसत आहे. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने त्याच्या स्वत: चा चित्रपट बाहुबली, तसेच सूर्यवंशी आणि द काश्मीर फाइल्स यांचे पहिल्या आठवड्यातील कलेक्शनला (Collection) मागे टाकले आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 132 कोटींची कमाई केली आहे.

Box office collection : 'RRR' चित्रपटाचा बॉक्सवर धमाका सुरूच..., जॉनच्या अटॅकची इतके कोटींची कमाई!
RRR चित्रपट बाॅक्स आॅफिसवर होतोय हिट
Image Credit source: TV9
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Apr 02, 2022 | 12:16 PM

मुंबई : RRR चित्रपट (RRR Movie) बॉक्स ऑफिसवर चांगलाच धमाका करताना दिसत आहे. एसएस राजामौली यांच्या चित्रपटाने बाहुबली, तसेच सूर्यवंशी आणि द काश्मीर फाइल्स या पहिल्या आठवड्यातील कलेक्शनला (Collection) मागे टाकले आहे. या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 132 कोटींची कमाई केली आहे. याशिवाय गेल्या शुक्रवारचे बोलायचे झाले तर या चित्रपटाने (Movie) 13 कोटींची कमाई देखील केली आहे. एकूण 8 दिवसात या चित्रपटाने 145 कोटी आणि आता 200 रुपयांची कमाई केली आहे.

कोटींच्या आकड्याकडे वाटचाल सुरूच

Boxofficeindia.com च्या मते, गुरुवारी चित्रपटाचे कलेक्शन ₹11.50 कोटी होते. रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, पहिला आठवडा चित्रपट हिट ठरला आहे आणि आता दुसरा शुक्रवार आहे जो बाॅक्स आॅफिसवर चित्रपट धमाल करेल. RRR च्या पहिल्या आठवड्यातील कलेक्शनने इतर चित्रपटांना मागे टाकले आहे. जॉन अब्राहमचा नुकताच प्रदर्शित झालेला अटॅक या चित्रपटाने पहिल्या दिवशी फारशी कमाई केलेली नाही. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 2.75 कोटींची कमाई केली आहे, जी जॉनच्या चित्रपटांच्या तुलनेत खूपच कमी आहे. 20 कोटींचा आकडाही गाठण्यासाठी चित्रपटाला संघर्ष करावा लागणार असल्याचे दिसते आहे.

जगभरातील कलेक्शन 700 कोटींच्या जवळपास

विवेक अग्निहोत्रीचा चित्रपट ‘द काश्मीर फाइल्स’नेही 300 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत 238.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक मनोबाला विजयबालन यांनी गुरुवारी केलेल्या ट्विटनुसार, RRR चित्रपटाचे सहा दिवसांचे जगभरातील कलेक्शन 700 कोटींच्या जवळपास आहे. RRR भरपूर कमाई करत आहे आणि येत्या काही दिवसांत त्याची कमाई आणखी वाढणार आहे. पण जॉन अब्राहमच्या अटॅक या चित्रपटाची सुरुवात म्हणावी तशी झाली नाहीये.

संबंधित बातम्या : 

Indiadn Indial Marathi : ‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर अशोक सराफ यांच्या येण्याने आठवणींना येणार उजाळा…

Ganesh Acharya : नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल, अश्लील व्हिडीओ बघण्यास बळजबरी, पाठलाग केल्याचे गंभीर आरोप


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें