पावनखिंडसाठी कौतुक तर द काश्मीर फाईल्ससाठी शिव्या; लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल चिन्मय मांडलेकरला काय वाटतंय?

'पावनखिंड'मध्ये (Pawankhind) छत्रपती शिवाजी महाराज आणि 'द काश्मीर फाईल्स'मध्ये (The Kashmir Files) दहशतवादी बिट्टा या दोन्ही टोकाच्या भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरनं (Chinmay Mandlekar) अत्यंत सहज वाटाव्या अशा साकारल्या आहेत. एकीकडे पावनखिंडमध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यानंतर आदराने मान खाली झुकते, तर दुसरीकडे द काश्मीर फाईल्समध्ये क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या बिट्टाच्या भूमिकेत त्याला पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते.

पावनखिंडसाठी कौतुक तर द काश्मीर फाईल्ससाठी शिव्या; लोकांच्या प्रतिक्रियांबद्दल चिन्मय मांडलेकरला काय वाटतंय?
अभिनेता चिन्मय मांडलेकरImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 18, 2022 | 8:17 PM

‘पावनखिंड’मध्ये (Pawankhind) छत्रपती शिवाजी महाराज आणि ‘द काश्मीर फाईल्स’मध्ये (The Kashmir Files) दहशतवादी बिट्टा या दोन्ही टोकाच्या भूमिका अभिनेता चिन्मय मांडलेकरनं (Chinmay Mandlekar) अत्यंत सहज वाटाव्या अशा साकारल्या आहेत. एकीकडे पावनखिंडमध्ये त्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत पाहिल्यानंतर आदराने मान खाली झुकते, तर दुसरीकडे द काश्मीर फाईल्समध्ये क्रूरतेचा कळस गाठणाऱ्या बिट्टाच्या भूमिकेत त्याला पाहिल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते. या भावना जितक्या टोकाच्या आहेत, तितक्याच टोकाच्या या दोन्ही भूमिका आहेत. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर यश गाठलंय आणि सोशल मीडियावरही नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय. या भूमिकांसाठी जेव्हा लोकांच्या सकारात्मक किंवा नकारात्मक प्रतिक्रिया येतात, तेव्हा चिन्मयला काय वाटतं, याविषयी तो व्यक्त झाला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो याविषयी बोलला आहे.

“समोर असता तर चपलेनं मारलं असतं असं जेव्हा लोक म्हणतात..”

‘फिल्मी फिव्हर’ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय म्हणाला, “मी याकडे कौतुक म्हणूनच बघतो. जेव्हा लोक म्हणतात आम्हाला तुमचा राग येतो, तुम्ही आमच्यासमोर असता तर चपलेनं मारलं असतं, तर ही माझ्यासाठी प्रशंसाच आहे. लोकांचा त्या व्यक्तीरेखेवर राग आहे, वैयक्तिक आयुष्यात तर ते चिन्मय मांडलेकरला ओळखतात. जसं एखाद्या हिरोचा डान्स आवडला तर त्याला आपण कॉपी करण्याचा प्रयत्न करतो, टाळ्या वाजवतो. तसंच जर आपल्याला एखाद्या व्हिलनचं काम आवडलं तर तुम्हाला रागच आला पाहिजे. तो राग येत असेल तर मी माझं काम ठिकठाक करतोय असं मला वाटतं.”

“आता चित्रपट पाहिल्यानंतर लोकांच्या मनात बिट्टाविषयी ज्या भावना आहेत, जो राग आहे, तो मला स्क्रिप्ट वाचताच आला होता. मी विवेकजींना विचारलं होती की हे खरं आहे का? ते हो म्हणाले. तेव्हा अशा मानसिकतेचे लोक कसा विचार करत असतील, याचा विचार मी करत होतो. ज्याच्यासाठी एखाद्याचा जीव घेणं म्हणजे रोजचं काम असेल, तो कसा असेल? याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही. पण अभिनय यालाच म्हणतात की तुम्हाला अशा अनेक भूमिका साकाराव्या लागतात, ज्यांच्याशी तुम्ही कदाचित रिलेटसुद्धा करू शकत नाही,” असं तो पुढे म्हणाला.

पावनखिंड आणि द काश्मीर फाईल्स या दोन्ही चित्रपटांमधील चिन्मयच्या अभिनयाचं भरभरून कौतुक होत आहे. अशाच प्रकारच्या भूमिका भविष्यातही मिळाव्यात अशी अपेक्षा चिन्मयने यावेळी व्यक्त केली. ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट 11 मार्च रोजी प्रदर्शित झाला असून अवघ्या सात दिवसांत या चित्रपटाने 90 कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.

हेही वाचा:

The Kashmir Files मध्ये क्रूरतेची हद्द पार करणारा ‘बिट्टा’ कोण आहे? जो म्हणाला, “आईलाही मारू शकतो”

‘ट्रकमध्ये सीटच्या मागे लपून पळालो होतो’; The Kashmir Files पाहून अभिनेत्रीने सांगितला मन हेलावणारा अनुभव

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.