Love Story | ‘उरी’च्या प्रमोशन दरम्यान जुळलं यामी आणि आदित्यचं सूत, माध्यमांपासून नेहमीच राहिले दूर!

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि चित्रपट निर्माते आदित्य धर (Aditya Dhar) यांनी नुकतेच सात फेरे घेतले आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

Love Story | ‘उरी’च्या प्रमोशन दरम्यान जुळलं यामी आणि आदित्यचं सूत, माध्यमांपासून नेहमीच राहिले दूर!
यामी-आदित्य

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि चित्रपट निर्माते आदित्य धर (Aditya Dhar) यांनी नुकतेच सात फेरे घेतले आहेत. दोघांनीही सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. यामी आणि आदित्यचे लग्न अभिनेत्रीच्या गावी झाले होते. या लग्नात फक्त कुटुंबातीलच सदस्यच उपस्थित होते. आता यामीने चाहत्यांना तिच्या लव्ह स्टोरीविषयी सांगितले आहे.

हिंदुस्तान टाईम्सशी खास चर्चा करताना यामीने सांगितले की, हे पहिल्याच नजरेतील प्रेम नव्हते. पूर्वी आम्ही चांगले मित्र होतो, त्यानंतर हे नाते प्रेमात बदलले. यामीने सांगितले की, आम्ही उरीच्या प्रमोशन दरम्यान एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. या दरम्यान आम्ही बोलू लागलो. मग, आमची मैत्री सुरू झाली.

आदित्य आवडू लागला

यामी आणि आदित्यचे नाते व्यावसायिक कामातूनच सुरू झाले. पण, मग हे नातं प्रेमात बदललं. यामीला जेव्हा विचारले गेले की, आदित्य तुझा जीवनसाथी होईल, हे तुला कधी कळले? याबद्दल बोलताना, यामी म्हणाली की, हे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेता, तेव्हा आपल्या आवडी समान असणे आवश्यक नाही. परंतु, आपली मूल्य प्रणाली समान असावी आणि आम्हा दोघांमध्ये बरीच समानता आहेत. एक व्यावसायिक व्यक्ती म्हणून मी आदित्यचा खूप आदर करते.

यामी पुढे म्हणाली की, लग्नाआधी बरेच लोक आणि माझे मित्र मला विचारत होते की, तुम्ही इतके शांत कसे आहात? पण मी आनंदी होते. कारण, मला खात्री होती की, मी जे करत होते ते बरोबर होते. मी भाग्यवान आहे की मला आदित्य आणि आणखी एक कुटुंब मिळाले.

मित्रांनी देखील जपली प्रायव्हसी

यामीला जेव्हा विचारले गेले की, इंडस्ट्रीमधील त्यांच्या नात्याबद्दल कोणालाही माहिती होती का?  तेव्हा ती हसली आणि म्हणाली की, मला वाटते हे सांगण्याची ही योग्य वेळ नाही. मी माझ्या मित्रपरिवाराचा खूप आदर करतो. आमच्या कॉमन मित्रांपैकी बर्‍याच जणांनी आमच्या प्रायव्हसीची काळजी घेतली.

नेहमीच साधे लग्न हवे होते!

यामी म्हणाली की, कोरोना संसर्गामुळे तिच्या लग्ना सोहळ्यात काहीही बदल झालेला नाही. जरी कोणताही रोग पसरलेला नसता, तरीही आम्ही आता ज्या पद्धतीने केवळ कुटुंबातील सदस्यांचा सहभागात लग्न केले, त्याच पद्धतीने लग्न केले असते. इतकेच नाही तर, लग्न आता ज्या ठिकाणी झाले आहे, त्याच ठिकाणी झाले असते. आम्ही खरोखरच असे आहोत आणि आमचे कुटुंब खूप आनंदी आहे. मी आधीच विचार केला होता की, लग्नात आईचीच साडी नेसेन आणि आजीने मला दिलेला दुपट्टा घेईन.

(Cute and simple love story of actress Yami Gautam and Aditya Dhar)

हेही वाचा :

राज कुंद्राच्या अटकेनंतर पत्नी शिल्पा शेट्टी ‘सुपर डान्सर चॅप्टर 4’ मधून बाहेर?, सेटवर गैर हजेरीमुळे चर्चांना उधाण!

‘त्याला उगाच बदनाम करण्याचा प्रयत्न करु नका’, राज कुंद्राच्या समर्थनार्थ पुढे आली राखी सावंत

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI