AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan | ओपनिंग जबरदस्त तरीही साऊथच्या या दोन चित्रपटांना मागे टाकण्यात पठाण चित्रपटाला अपयश

शाहरुख खान याचा पठाण चित्रपट बघून चाहते फिदा झाले आहेत. पठाण चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला होता.

Shah Rukh Khan | ओपनिंग जबरदस्त तरीही साऊथच्या या दोन चित्रपटांना मागे टाकण्यात पठाण चित्रपटाला अपयश
Pathaan
| Updated on: Jan 26, 2023 | 6:53 PM
Share

मुंबई : सर्वत्र सध्या अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याच्या पठाण चित्रपटाची चर्चा रंगताना दिसत आहे. शाहरुख खान याने तब्बल चार वर्षांनंतर बाॅलिवूडमध्ये पठाण चित्रपटाच्या माध्यमातून जोरदार पुनरागमन नक्कीच केले आहे. २०१९ मध्ये शेवटी झिरो या चित्रपटामध्ये शाहरुख खान हा दिसला होता. यामुळे शाहरुख खान याच्या पठाण या चित्रपटाकडून सर्वांनाच मोठ्या अपेक्षा होत्या. विशेष म्हणजे शाहरुख खान हा देखील चाहत्यांच्या अपेक्षांमध्ये खरा उतरला आहे. पठाण चित्रपटामध्ये शाहरुख खान याचा कधीही न बघितलेल्या अंदाज बघायला मिळतोय. शाहरुख खान याचा पठाण चित्रपट बघून चाहते फिदा झाले आहेत. पठाण चित्रपट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. मात्र, हाच वाद चित्रपटासाठी फायदेशीर ठरल्याचे दिसत आहे.

पठाण चित्रपटाची रिलीज डेट जाहिर झाल्यापासूनच शाहरुख खान याच्या चाहत्यांमध्ये या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. विशेष म्हणजे चित्रपटाचे टीझर रिलीज झाल्यावर एक अंदाजा आला की, शाहरुख खान हा या चित्रपटामध्ये काहीतरी धमाल नक्कीच करणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाॅलिवूडचे चित्रपट बाॅक्स आॅफिसवर काही खास कमाल करू शकत नसतानाच पठाण या चित्रपटाने जबरदस्त ओपनिंग केलीये. पठाण चित्रपटातील बेशर्म रंग हे गाणे रिलीज झाल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.

बेशर्म रंग गाणे रिलीज झाल्यानंतर अनेकांनी पठाण या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी थेट करून टाकली होती. यामुळे चित्रपटाला फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली. मात्र, आता चित्रपट रिलीज झाल्यानंतर याचा चित्रपटाला फायदा झाल्याचे दिसत आहे.

जरी शाहरुख खान याचा पठाण हा चित्रपट बाॅक्स आॅफिसवर धमाका करत असला आणि चित्रपटाच्या ओपनिंग डेला चित्रपटाने 55 कोटीं कमावले आहेत. तरीही पठाण या चित्रपटाला साऊथच्या दोन चित्रपटांना ओपनिंग डेच्या कमाईमध्ये मागे टाकण्यात अपयश मिळाले.

साऊथच्या आरआरआर चित्रपटाने ओपनिंग डेला जगभरातून 225.5 कोटी कमावले होते. तर बाहुबली 2 ने ओपनिंग डेला जगभरातून 213 कोटी कमावले होते. शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटाला हे रेकाॅर्ड तोडण्यात अपयश आले आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच