मुंबई- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार धनुष (Dhanush) आणि त्याची पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांनी जवळपास नऊ महिन्यांपूर्वी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. 18 वर्षांच्या संसारानंतर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी दोघांना खूप समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांचं पुन्हा पॅचअप झालं की नाही, याबाबत अधिकृत माहिती नव्हती. आता दोघांनीही घटस्फोट (Divorce) न घेण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय.