Dilip Kumar Top 5 Films : ‘नया दौर’पासून ‘राम और शाम’पर्यंत, दिलीप कुमारांचे सुपरहिट चित्रपट आजही लोकप्रिय!

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत 6 दशकांहून अधिक काळ काम केले आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येकजण त्यांचे मोठे चाहते आहेत. त्यांनी प्रत्येक पिढीतील कलाकारांना प्रेरणा दिली आहे.

Dilip Kumar Top 5 Films : ‘नया दौर’पासून ‘राम और शाम’पर्यंत, दिलीप कुमारांचे सुपरहिट चित्रपट आजही लोकप्रिय!
दिलीप कुमार
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 07, 2021 | 11:15 AM

मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार (Dilip Kumar) यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीत 6 दशकांहून अधिक काळ काम केले आहे. इंडस्ट्रीतील प्रत्येकजण त्यांचे मोठे चाहते आहेत. त्यांनी प्रत्येक पिढीतील कलाकारांना प्रेरणा दिली आहे, त्यापैकी एक म्हणजे शाहरुख खान. दिलीप कुमारने ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर त्यांनी ‘मुगल-ए-आजम’, ‘नया दौर’ अशा अनेक आयकॉनिक चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि बरेच पुरस्कार देखील जिंकले आहेत. चला तर जाणून घेऊया दिलीप कुमार यांच्या 5 सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल…(Dilip Kumar Top 5 Films Naya Daur to Ram Aur Sham Dilip Kumar superhit films are still popular today)

मुगल-ए-आजम :

दिलीपकुमार यांचा क्लासिक चित्रपट ‘मुगल-ए-आजम’ 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला होता. त्या काळात, दीड कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने कोटय़वधींचा व्यवसाय केला होता. दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसले. या चित्रपटाने नॅशनल ते फिल्मफेअर अवॉर्डपर्यंत अनेक पुरस्कार जिंकले होते.

नया दौर :

या चित्रपटात दिलीपकुमार यांच्यासह वैजयंती माला महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसल्या होत्या. हा चित्रपट मशीन आणि माणूस यांच्यातील संघर्षावर आधारित आहे. दिलीप कुमार यांच्या या चित्रपटाने सर्वांची मने जिंकली होती, तसेच सर्वांना भावनिक केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन बी.आर.चोप्रा यांनी केले होते.

देवदास :

दिलीप कुमार यांच्या ‘देवदास’ या चित्रपटापासून वैजयंती माला यांना बॉलिवूडमध्ये खरी ओळख मिळाली. या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. हा चित्रपट बॉलिवूडसाठी एक उदाहरण ठरला.

राम और श्याम :

दिलीप कुमारच्या ‘राम और श्याम’ या क्लासिक चित्रपटामध्ये वहीदा रहमान आणि मुमताज महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसल्या. या चित्रपटात दिलीप कुमार यांनी डबल रोल साकारला होता. दोन्ही पात्रं एकमेकांपेक्षा वेगळी होती आणि त्यांनी ही पात्रं उत्तम प्रकारे निभावली.

गंगा जमुना :

दिलीप कुमार या चित्रपटात एका अल्लड गावकऱ्याच्या भूमिकेत दिसले होते. या चित्रपटात ते भोजपुरी बोलत होते. यासाठी तो टिपिकल भोजपुरी शिकले होते. हा चित्रपट 1961 मध्ये प्रदर्शित झाला होता.

(Dilip Kumar Top 5 Films Naya Daur to Ram Aur Sham Dilip Kumar superhit films are still popular today)

हेही वाचा :

Dilip Kumar Death: दिलीप कुमार यांना पाहण्यासाठी सायकलवरून गेलो होतो, शरद पवारांनी जागवल्या ट्रॅजेडी किंगच्या आठवणी!

Dilip Kumar Latest Photos : दिलीप कुमारांचे पार्थिव घराच्या दिशेने रवाना, सायंकाळी पार पडणार अंत्यविधी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें