Drugs Case | आर्यन-अनन्यानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटीचा नोकर NCBच्या रडारवर, अभिनेत्रीला ड्रग्ज पुरवल्याचा संशय!

मुंबई ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेत्री अनन्या पांडेची गुरुवारी आणि शुक्रवारी चौकशी केली. असे वृत्त आहे की एनसीबीला कळले आहे की, अभिनेत्री आर्यन खानला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीला ओळखते. यासोबतच शुक्रवारी एनसीबीच्या रडारवर एका ‘सुप्रसिद्ध व्यक्ती’चा 24 वर्षीय नोकरही आल्याची माहिती समोर येत आहे.

Drugs Case | आर्यन-अनन्यानंतर प्रसिद्ध सेलिब्रिटीचा नोकर NCBच्या रडारवर, अभिनेत्रीला ड्रग्ज पुरवल्याचा संशय!
Ananya Panday

मुंबई : मुंबई ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) अभिनेत्री अनन्या पांडेची गुरुवारी आणि शुक्रवारी चौकशी केली. असे वृत्त आहे की एनसीबीला कळले आहे की, अभिनेत्री आर्यन खानला ड्रग्स पुरवणाऱ्या व्यक्तीला ओळखते. यासोबतच शुक्रवारी एनसीबीच्या रडारवर एका ‘सुप्रसिद्ध व्यक्ती’चा 24 वर्षीय नोकरही आल्याची माहिती समोर येत आहे.

एनसीबीने शुक्रवारी नोकराची चौकशी केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. या व्यक्तीने ‘अनन्याच्या सांगण्यावरून आर्यनला ड्रग्स पोहोचवले’ असे म्हटले जात आहे. अधिकाऱ्यांनी ‘ड्रग पॅडलर नोकर’ ला मुंबईच्या मालाड भागातून ताब्यात घेतले आहे आणि सोमवारी पुन्हा त्याला चौकशीसाठी बोलावले आहे. प्रदीर्घ चौकशीनंतर त्याचा मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे.

आर्यन खान ड्रग्ज केस प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेचं नाव समोर आलं आहे. तिने आर्यन खानशी ड्रग्जसंबंधित व्हॉट्सअप चॅट केल्याचं समोर आलं आहे. याचप्रकरणी एनसीबी तिची चौकशी करत आहे. गुरुवारी अनन्या पांडेचं नाव समोर आल्यानंतर एनसीबीने थेट अनन्याचं घर गाठलं. तिला दुपारी चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स दिलं. तिची त्याच दिवशी 2 तास चौकशीही केली गेली. काल (शुक्रवारी) पुन्हा एकदा अनन्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र अनन्या उशिरा गेल्याने समीर वानखेडे यांचा चांगलाच पारा चढला.

NCB च्या ऑफिसमध्ये नेमकं काय घडलं?

अनन्या पांडेला शुक्रवारी सकाळी 11 वाजता चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. पण अगोदरच्या दिवशी एनसीबीने सुमारे सव्वा दोन तास चौकशी केल्याने अनन्या अगोदरच डिप्रेशनमध्ये आली होती. ती खूपच भेदरलेली होती. त्यामुळे शुक्रवारी अकरा वाजताची वेळ असताना देखील ती चौकशीसाठी दुपारी 2 वाजता एनसीबी ऑफिसमध्ये पोहोचली.

अनन्याची चौकशी वेळ 11 वाजता होती. त्यामुळे चौकशी अधिकारी अगोदरच ऑफिसमध्ये आले होते. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना तब्बल तीन तास अनन्याने वाट पाहायला लावली. ती दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एनसीबीने कार्यालयात पोहोचली.

यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांना ताटकळत ठेवणाऱ्या अनन्या पांडेचा झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी चांगलाच समाचार घेतला. “तुला 11 वाजता बोलावलं होतं, तू दोन वाजता कशी काय येऊ शकतेस? प्रोडक्शन हाऊस समजलीस काय, पण हे NCB कार्यालय आहे, हे लक्षात ठेव”, अशा शब्दात समीर वानखेडे यांनी अनन्याला खडसावलं.

एनसीबीकडून अनन्याची दोन तास चौकशी

अनन्या पांडे ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या तावडीत अडकली आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी एनसीबीने आर्यन खान ड्रग्स प्रकरणाबाबत अनन्या पांडेची 2 तास चौकशी केली. आर्यन खान आणि अनन्या पांडेच्या गप्पांमध्ये आर्यन अनन्याशी एका ठिकाणी गांजाबद्दल बोलत होता. आर्यन विचारत होता की, काही जुगाड होऊ शकते का? यावर अनन्याने उत्तर दिले आणि सांगितले की, “मी व्यवस्था करीन”, असं चॅटमध्ये समोर आलंय.

या दरम्यान, अनन्या पांडेने एनसीबीच्या चौकशी दरम्यान कबूल केले की, तिने आर्यन खानला वीड अर्थात गांजा दिला होता, पण ती कोणत्याही ड्रग पुरवठादार किंवा ड्रग्ज पेडलरशी संपर्कात नाही.

हेही वाचा :

Tina Datta : टॉपशिवाय ओव्हरकोट परिधान करत टीना दत्ताने दाखवला सुपरबोल्ड लूक, पाहा फोटो

घटस्फोटानंतर समंथाने पूर्ण केलं स्वतःचं स्वप्न, ‘सेल्फ टाईम’ला महत्त्व देत अभिनेत्री करतेय पुढे जाण्याचा प्रयत्न!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI