Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात NCBची धडक कारवाई, आणखी एक ड्रग्ज पेडलरला घेतले ताब्यात!

एनसीबीने काल रात्री उशिरा एका 24 वर्षीय ड्रग पेडलरला ताब्यात घेतले. तो या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे, ज्याचे नाव ड्रग संबंधित चॅटमध्ये समोर आले आहे. रात्री उशिरा 3.45च्या सुमारास एनसीबी टीम 20 ते 22 वर्षाच्या मुलाला घेऊन आली होती, एनसीबी अधिकारी हा मुलगा कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

Drugs Case | ड्रग्ज प्रकरणात NCBची धडक कारवाई, आणखी एक ड्रग्ज पेडलरला घेतले ताब्यात!
NCB arrest
Follow us
| Updated on: Oct 22, 2021 | 10:28 AM

मुंबई : एनसीबीने काल रात्री उशिरा एका 24 वर्षीय ड्रग पेडलरला ताब्यात घेतले. तो या प्रकरणातील प्रमुख संशयित आहे, ज्याचे नाव ड्रग संबंधित चॅटमध्ये समोर आले आहे. रात्री उशिरा 3.45च्या सुमारास एनसीबी टीम 20 ते 22 वर्षाच्या मुलाला घेऊन आली होती, एनसीबी अधिकारी हा मुलगा कोण आहे याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही.

अभिनेत्री अनन्या पांडे देखील सकाळी 11 वाजताच्या दरम्यान  बॅलार्ड पियरच्या एनसीबी कार्यालयात हजर होणार आहे. आज (22 ऑक्टोबर) आणखी 2 लोकांना NCB ने चौकशीसाठी बोलावले पण त्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. ड्रग्ज प्रकरण समोर आल्यापासून NCBने धाक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

रिपोर्ट्सनुसार, अनन्या पांडे सोबत, ड्रग्स चॅटमध्ये आर्यन खानची बहीण सुहाना खानचे नावही समोर आले आहे. अनन्या पांडेच्या घरून बाहेर आल्यानंतर एनसीबीची एक टीम शाहरुख खानच्या मन्नतच्या घरी पोहोचली, जिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे.

न्यायालयीन कोठतीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीये. आज पुन्हा एकदा NDPS कोर्टाने आर्यन खानच्या न्यायलयीन कोठडीत वाढ केली आहे. त्याच्यासोबत इतर सात जणांची न्यायालयीन कोठडी 30 ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय दिल्यानंतर आता शाहरुख खान तसेच त्याचे वकील कोणता निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मात्र कोर्टाच्या या निर्णयामुळे आर्यन खानच्या पाठीमागे लागलेले शुक्लकाष्ठ संपताना दिसत नाहीये.

करण जोहरही निशाण्यावर!

गेल्या वर्षी दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासादरम्यान ड्रग्स अँगल समोर आल्यानंतर बॉलिवूड स्टार्सची चौकशी सुरू झाली, तेव्हा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वेगाने व्हायरल झाला. हा व्हिडीओ बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहरच्या घरातील होता, जिथे अनेक बॉलिवूड स्टार्स पार्टी करताना दिसत होते. करण जोहरच्या या पार्टीमध्ये ड्रग्जचा वापर करण्यात आल्याचा दावा या व्हिडीओबाबत करण्यात आला होता.

या व्हिडीओची तपासणी करण्यात आली होती, परंतु त्या वेळी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने त्याबाबत कोणतेही विधान दिले नव्हते. जरी, करण जोहरने आपले निवेदन जारी करताना त्याच्यावरील आरोप फेटाळले होते. परंतु, त्याला एनसीबीकडून क्लीन चिट देखील मिळाली नाही. दरम्यान, अशी बातमी आहे की करण जोहरच्या 2019 पार्टीचा हा व्हिडीओ पुन्हा एकदा NCB च्या रडारवर आहे.

करण जोहरच्या पार्टीचा व्हिडीओ NCB च्या रडारवर!

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणाचा तपास एनसीबीने बंद केलेला नाही. एवढेच नाही तर एनसीबीला या प्रकरणाच्या चौकशीसाठी केंद्र सरकारकडून 6 महिन्यांचा अधिक वेळ मिळाला आहे. समीर वानखेडे यांनी या व्हिडीओची चौकशी सुरू ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती, जी त्यांना मिळाली आहे. आता यानंतर अनेक बॉलिवूड स्टार्स समीर वानखेडे यांच्या निशाण्यावर येणार आहेत.

हेही वाचा :

करण जोहरचा आयकॉनिक चित्रपट पाहून भडकल्या होत्या शबाना आझमी, फोन करून सुनावले खडे बोल!

अनन्या पांडेची आजची चौकशी संपली, उद्या पुन्हा वानखेडेंसमोर हजेरी, नेमकं काय-काय घडलं?

Non Stop LIVE Update
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.