AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farhan-Shibani Wedding | नव्या वर्षात फरहान अख्तर-शिबानी दांडेकर अडकणार लग्नबंधनात, विवाह सोहळ्याचे ठिकाणही ठरले!

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (farhan Akhtar) आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते इंडस्ट्रीतील सर्वात चार्मिंग आणि क्युट कपल मानले जाते. दोघेही नेहमी मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करतात आणि सोशल मीडियावर दोघांची फॅन फॉलोइंगही अफलातून आहे.

Farhan-Shibani Wedding | नव्या वर्षात फरहान अख्तर-शिबानी दांडेकर अडकणार लग्नबंधनात, विवाह सोहळ्याचे ठिकाणही ठरले!
Farhan-Shibani
| Updated on: Jan 04, 2022 | 1:13 PM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर (farhan Akhtar) आणि अभिनेत्री शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. ते इंडस्ट्रीतील सर्वात चार्मिंग आणि क्युट कपल मानले जाते. दोघेही नेहमी मोकळेपणाने आपलं प्रेम व्यक्त करतात आणि सोशल मीडियावर दोघांची फॅन फॉलोइंगही अफलातून आहे. अनेक दिवसांपासून दोघांचे चाहते या जोडप्याने लग्न करावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. आता लवकरच दोघेही त्यांच्या चाहत्यांची ही इच्छा पूर्ण करणार आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shibani Dandekar (@shibanidandekar)

बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, फरहान आणि शिबानीने मार्च 2022 मध्ये मुंबईत आलिशान लग्नाची योजना आखली होती. मात्र, आता हे जोडपे या लग्नाचे आयोजन खूपच कमी प्रमाणात आणि जवळच्या मित्रांसोबत करणार आहे. कारण, कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. याशिवाय मुंबईत असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे अलीकडेच कोविड पॉझिटिव्ह आढळले आहेत.

जवळचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार

रिपोर्टमध्ये एका जवळच्या सूत्राने सांगितले की, आता फक्त फरहान आणि शिबानीचे कुटुंबीय आणि काही जवळचे मित्र या लग्नात सहभागी होणार आहेत. फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर बऱ्याच काळापासून एकमेकांसोबत राहत आहेत आणि कोरोनामुळे त्यांच्या लग्नाला खूप उशीर झाला आहे. आता दोघांनाही हे लग्न आणखी पुढे ढकलायचे नाही.

लग्नाचे ठिकाण कुठे?

मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने त्यांच्या लग्नाचे ठिकाण म्हणून एक 5 स्टार हॉटेल बुक केले आहे आणि जवळपास सर्व काही फायनल झाले आहे. फरहान आणि शिबानी यांनीही विकी कौशल आणि कतरिना कैफ प्रमाणेच डिझायनर सब्यसाचीचे कपडे परिधान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या कपड्यांचा रंग हलका पण आकर्षक असणार आहे. गेल्या 3 वर्षांपासून हे जोडपे एकमेकांसोबत नात्यात आहे. शिबानी दांडेकरने फरहानच्या नावाचा टॅटू देखील काढला आहे.  दोघेही अनेकदा एकमेकांसोबतचे रोमँटिक क्षण सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. या जोडीचे फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात.

हेही वाचा :

स्वप्नील जोशीने नवीन वर्षातील नवीन चित्रपटाची केली घोषणा, ‘अश्वत्थ’चा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला!

जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रियादेखील कोरोना पॉझिटिव्ह, सोशल मीडियाद्वारे दिली माहिती!

Khatija | वाढदिवशीच खातिजा अडकली खास नात्यात!, पाहा कोण आहे ए आर रहमानचा होणारा जावई Riyasdeen?

Happy Birthday Aditya Pancholi | फिल्मी करिअरसाठी निर्मल पांचोली ‘आदित्य पांचोली’ बनला! वाचा त्याचा बॉलिवूड प्रवास…

महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.