Perfume Ad: ‘बलात्कार म्हणजे विनोद वाटतो का?’, परफ्युमच्या जाहिरातीवर भडकले सेलिब्रिटी

'ही जाहिरात बनवणं म्हणजे कोणता अपघात नाही. एखादी जाहिरात बनवण्यासाठी अनेक निर्णयांच्या प्रक्रियांमधून ब्रँडला जावं लागतं. क्रिएटिव्ह, स्क्रिप्ट, एजन्सी, ग्राहक, कास्टिंग.. या सर्वांना बलात्कार म्हणजे विनोद वाटतोय का?,' अशा शब्दांत रिचाने संताप व्यक्त केला.

Perfume Ad: 'बलात्कार म्हणजे विनोद वाटतो का?', परफ्युमच्या जाहिरातीवर भडकले सेलिब्रिटी
Richa, Farhan and Priyanka
Image Credit source: Twitter
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

Jun 05, 2022 | 2:56 PM

सोशल मीडियावर सध्या ‘लेयर शॉट’ या परफ्युमची जाहिरात (Perfume Ad) जोरदार चर्चेत आहे. या जाहिरातीवर नेटकरी आणि सेलिब्रिटींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. फरहान अख्तर (Farhan Akhtar), प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra), रिचा चड्ढा, स्वरा भास्कर, सोना मोहपात्रा यांसारख्या सेलिब्रिटींनी या जाहिरातीवर ताशेरे ओढले आहेत. या जाहिरातीतून बलात्कारसारख्या घटनांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप होतोय. ‘सामूहिक बलात्काराला प्रोत्साहन देणाऱ्या अशा दुर्गंधीयुक्त बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवर विचार करण्यासाठी, ती जाहिरात बनविण्यासाठी आणि ते मंजूर करण्यासाठी किती विचित्र डोकी कामाला लागली असतील? लज्जास्पद’, अशा शब्दांत फरहानने जाहिरातीवर टीका केली.

सेलिब्रिटींनी व्यक्त केला संताप

‘ही जाहिरात बनवणं म्हणजे कोणता अपघात नाही. एखादी जाहिरात बनवण्यासाठी अनेक निर्णयांच्या प्रक्रियांमधून ब्रँडला जावं लागतं. क्रिएटिव्ह, स्क्रिप्ट, एजन्सी, ग्राहक, कास्टिंग.. या सर्वांना बलात्कार म्हणजे विनोद वाटतोय का? या ब्रँडवर आणि त्याची जाहिराती बनवणाऱ्या एजन्सीवर कारवाई झाली पाहिजे’, अशा शब्दांत रिचाने संताप व्यक्त केला.

बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिनेसुद्धा ट्विट करत जाहिरात करणाऱ्यांना सुनावलं आहे. ‘लज्जास्पद आणि घृणास्पद! या जाहिरातीला हिरवा कंदिल देण्यासाठी किती जणांकडून परवानगी घ्यावी लागली असेल. किती जणांना ही जाहिरात ठीक वाटली असेल? यावर टीका झाली आणि नंतर त्यावर कारवाईही झाली ते बरं झालं’, असं प्रियांकाने म्हटलं.

नेमकं जाहिरातीत काय होतं?

दुहेरी अर्थाच्या संवादासह ही जाहिरात शूट करण्यात आली आहे. ज्यामध्ये चार मुलं ही शॉपिंग करण्यासाठी येतात. त्यांच्यासमोर एक मुलगी शॉपिंग करत असते. एकाच अँगलने परफ्युम आणि त्या मुलीचा सीन शूट करण्यात आला आहे. ‘ती एक आणि आपण चार, कोणाला शॉट मिळेल’ असं एक मुलगा म्हणतो. मुलगी घाबरून मागे पाहते तेव्हा ती मुलं परफ्युमच्या बॉटलबद्दल बोलत असल्याचं समजतं. या व्हिडीओवर सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जातोय.

हे सुद्धा वाचा


Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें