Video | फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पाकिस्तानी अभिनेत्याने ‘गोविंदा’सोबत असे काही केले की…
या अवॉर्ड्समधील अनेक व्हिडीओ आणि फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

मुंबई : यावर्षी दुबईमध्ये फिल्मफेअर अवॉर्ड्सचे आयोजन करण्यात आले होते. बाॅलिवूडच्या स्टार्ससोबतच पाकिस्तानी स्टार्सने देखील या अवॉर्ड्सला हजेरी लावली. या अवॉर्ड्समधील अनेक व्हिडीओ आणि फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, या अवॉर्ड्समधील एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडीओ दुसऱ्या तिसऱ्या कोणत्या व्यक्तीचा नसून पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा यांचा आहे.
विशेष म्हणजे फहाद यांचा हा व्हिडीओ पाहून भारतामधील लोक देखील त्याचे काैतुक करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहे.
सुरूवातीपासून भारतातील बाॅलिवूड कलाकारांना पाकिस्तानमधूनही खूप प्रेम मिळते. पाकिस्तानमधून बाॅलिवूड अभिनेते आणि अभिनेत्रींचे जबरदस्त फॅन फाॅलोइंग आहे.
विशेष बाब म्हणजे तेथील कलाकार देखील भारतीय कलाकारांचे मोठे फॅन असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये पाकिस्तानी अभिनेता फहाद मुस्तफा याला एक अवॉर्ड मिळाला.
View this post on Instagram
हा अवॉर्ड्स घेण्यासाठी स्टेजवर गेलेला फहाद मुस्तफा याने गोविंदाचे काैतुक करत म्हटले की, मी अभिनय फक्त आणि फक्त गोविंद सरांना पाहून शिकलो आहे.
माझ्यासाठी खरोखरच ही अत्यंत मोठी गोष्ट आहे की, त्यांच्या उपस्थितीमध्ये मला हा अवॉर्ड मिळाला आहे. पुढे फहाद मुस्तफा म्हणाला की, सर मी तुमचा खूप मोठा चाहता आहे.
इतकेच नाही तर फहाद मुस्तफा याने अवॉर्ड घेऊन स्टेजवरून खाली आल्यावर सर्वात पहिल्यांदा गोविंदाचे पाय पकडून आर्शीवाद देखील घेतले. आता हाच व्हिडीओ सोशल मीडियावर चांगला व्हायरल होतोय.
