AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rahul Jain: गायक राहुल जैनविरोधात बलात्काराचा आरोप; कॉस्च्युम स्टायलिस्टने दाखल केली FIR

ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या जबाबात संबंधित महिलेनं म्हटलं की राहुलने इन्स्टाग्रामद्वारे तिच्याशी संपर्क साधला. तिच्या कामाचं कौतुक करत त्याने आपली पर्सनल स्टायलिस्ट म्हणून तिची नेमणूक करण्यासाठी आश्वासन दिलं.

Rahul Jain: गायक राहुल जैनविरोधात बलात्काराचा आरोप; कॉस्च्युम स्टायलिस्टने दाखल केली FIR
अत्याचार प्रकरणात बॉलिवूडच्या 'या' गायकाला अटक होण्याची शक्यताImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Aug 16, 2022 | 10:23 AM
Share

गायक-संगीतकार राहुल जैनविरोधात (Rahul Jain) एका 30 वर्षीय कॉस्च्युम स्टायलिस्टने (costume stylist) तक्रार दाखल केली आहे. मुंबईतल्या अंधेरी (Andheri) इथल्या त्याच्या घरी राहुलने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप स्टायलिस्टने केला. 11 ऑगस्ट रोजी ही घटना घडल्याचं तिने म्हटलंय. याप्रकरणी पोलिसांनी राहुलविरोधात एफआयआर दाखल केली आहे. ओशिवरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या जबाबात संबंधित महिलेनं म्हटलं की राहुलने इन्स्टाग्रामद्वारे तिच्याशी संपर्क साधला. तिच्या कामाचं कौतुक करत त्याने आपली पर्सनल स्टायलिस्ट म्हणून तिची नेमणूक करण्यासाठी आश्वासन दिलं. यासाठी त्याने त्याच्या अंधेरीतल्या फ्लॅटमध्ये तिला बोलावलं. 11 ऑगस्ट रोजी ती त्याच्या घरी गेली असता काम देण्याचं आश्वासन देत त्याने तिच्यावर बलात्कार केला.

राहुलचा तिने प्रतिकार केला तेव्हा त्याने तिच्यावर हल्ला केला आणि नंतर पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला, असा आरोप संबंधित स्टायलिस्टने केला. पोलिसांनी राहुलविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (बलात्कार), 323 (स्वैच्छिक दुखापत) आणि 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत एफआयआर नोंदवला आहे, असं अधिकाऱ्याने सांगितलं. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

यावर उत्तर देताना राहुलने एका निवेदनात म्हटलं की, “मी या महिलेला ओळखत नाही. तिने केलेले आरोप खोटे आणि निराधार आहेत. यापूर्वीही एका महिलेने माझ्यावर असेच आरोप केले होते, पण मला न्याय मिळाला. ही महिला त्या महिलेची सहकारी असू शकते.” राहुलवर लैंगिक अत्याचाराचे आरोप होण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी राहुल आणि त्याच्या कुटुंबातील दोन सदस्यांवर बलात्कार, बळजबरीने गर्भपात, मूल सोडून दिल्याचा आणि फसवणूक केल्याचा आरोप होता.

राहुलने 2014 मध्ये MTV शो एमटीव्ही अलॉफ्ट स्टारमध्ये भाग घेतल्यानंतर संगीत उद्योगात त्याच्या करिअरची सुरुवात केली. त्याने स्पॉटलाइट या वेब सीरिजमधील तेरी याद, 1921 मधील आने वाले कल, घर से निकला, ना तुम रहे तुम आणि चल दिया तुमसे दूर यांसारखी गाणी गायली आहेत. त्याने ‘कागज’ आणि ‘झूठा कहीं का’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तसंच काही वेब सीरिजमध्येही संगीतकार म्हणून काम केलं आहे.

शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका
शिंदे, दादांचा मालक एकच! उद्धव ठाकरेंची शिंदेसेनेवर खोचक टीका.
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद
मुंबई महापौरपदावरून भाजप-शिंदे सेना आमने-सामने; लोढांच्या दाव्याने वाद.
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान
फडणवीसांचा मी लाडका मंत्री, त्यामुळे... ; नितेश राणे यांचं मोठं विधान.
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर
टोमणे मारणे हाच उद्योग राहिलाय! शिरसाट यांचं ठाकरेंना खोचक प्रत्युत्तर.
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक
सुप्रिया सुळेंनी लोकसभेत मांडले राईट टू डिस्कनेक्ट विधेयक.
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद
रुपाली पाटील पक्ष सोडणार? अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाद.
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत
शेवटी बाप हा बाप असतो! उदय सामंत यांचं ते विधान चर्चेत.
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप
सुरेश धसांकडून तीन हल्ले! मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप.
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस
इंडिगोला दणका! डीजीसीएची कारणे दाखवा नोटीस.
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक
तो एक व्हिजन असलेला प्रतिनिधी! शिंदेंकडून लेकाचं कौतुक.