Raksha Bandhan 2021 Wishes : ऐश्वर्या राय बच्चनपासून ते रिद्धिमा कपूरपर्यंत बॉलिवूड कलाकारांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

ऐश्वर्या राय बच्चन, झोया अख्तर, अंशुला कपूर, रिद्धिमा कपूर साहनीसह अनेक सेलेब्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (From Aishwarya Rai Bachchan to Riddhima Kapoor, Bollywood actors Raksha Bandhan special post)

Raksha Bandhan 2021 Wishes : ऐश्वर्या राय बच्चनपासून ते रिद्धिमा कपूरपर्यंत बॉलिवूड कलाकारांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा

मुंबई : रक्षाबंधन (Raksha Bandhan 2021) हा भाऊ आणि बहिणीचा खास सण आहे. या दिवशी प्रत्येक भाऊ आणि बहीण रुसवे-फुगवे  विसरून प्रेमानं एकमेकांना राखी बांधतात. आज हा सण जगभरात साजरा केला जात आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आपल्या भावंडांना शुभेच्छा देत आहे. बॉलिवूड सेलेब्स देखील रक्षाबंधनाच्या सर्वांना शुभेच्छा देत आहेत. तसेच त्यांचे भाऊ आणि बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत आहेत.

ऐश्वर्या राय बच्चन, झोया अख्तर, अंशुला कपूर, रिद्धिमा कपूर साहनीसह अनेक सेलेब्सनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

ऐश्वर्या राय बच्चननं बराच काळ सोशल मीडियापासून अंतर ठेवलं होतं. रक्षाबंधनाच्या खास निमित्तानं तिने तिचे फोटो शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. फोटो शेअर करत तिने लिहिलं – आपणा सर्वांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा. आपल्या भावंडांसोबत वेळ घालवा आणि काही खास आठवणी बनवा.

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Bachchan)

रिद्धिमा कपूर साहनी (Ridhima Kapoor)

रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूर साहनीनंही सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. तिने आई नीतू कपूर आणि भाऊ रणबीरसोबतचे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करत रिद्धिमाने लिहिले – राखीची शुभेच्छा . भरपूर प्रेम.

धर्मेंद्र (Dharmendra)

धर्मेंद्र यांनी एक महिलेनं सैनिकाला राखी बांधल्याचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले – रक्षाबंधनाच्या शुभेच्छा .. हा सण कोणत्याही पूजेपेक्षा कमी नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharmendra Deol (@aapkadharam)

एकता कपूर (Ekta Kapoor)

प्रोड्युसर एकता कपूरनंही मुलगा रविच्या राखीची झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. व्हिडीओ शेअर करताना तिनं लिहिलं – चुलत बहीण दियासोबत रविची राखी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Erk❤️rek (@ektarkapoor)

झोया अख्तर (Zoya Akhtar)

झोया अख्तरनेही भाऊ फरहानसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटो शेअर करताना तिने लिहिलं – फरहान आणि मी. रक्षाबंधनाच्या शुभेच्छा.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zoya Akhtar (@zoieakhtar)

अनुपम खेर (Anupam Kher)

अनुपम खेर यांनीही ट्विट करून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्वीट केलं- रक्षाबंधनाच्या शुभ सणासाठी आपणा सर्वांना हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

संबंधित बातम्या

Shilpa Shetty : राज कुंद्रा काँट्रोव्हर्सी दरम्यान शिल्पा शेट्टीची खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली, ‘कोणतीच शक्ती महिलेला…’

व्यक्तिरेखा जिवंत वाटावी म्हणून तासान् तास स्मशानात बसून राहायचा विकी कौशल, वाचा मसान चित्रपटाचा किस्सा…

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI