‘Bollyfame’ अ‍ॅप काम करत होता राज कुंद्रा, शमिता शेट्टीला करणार होता कास्ट, गहना वशिष्ठचा दावा!

'गंदी बात' या वेब सीरीजमधील प्रसिद्ध अभिनेत्री गहना वशिष्ठने (Gehana vasisth) राज कुंद्रा (Raj kundra) एका नव्या अ‍ॅपवर काम करत असल्याचे उघड केले आहे.

‘Bollyfame’ अ‍ॅप काम करत होता राज कुंद्रा, शमिता शेट्टीला करणार होता कास्ट, गहना वशिष्ठचा दावा!
राज-शमिता-गहना

मुंबई : ‘गंदी बात’ या वेब सीरीजमधील प्रसिद्ध अभिनेत्री गहना वशिष्ठने (Gehana vasisth) राज कुंद्रा (Raj kundra) एका नव्या अ‍ॅपवर काम करत असल्याचे उघड केले आहे. तो आपल्या पत्नी शिल्पा शेट्टी हिची बहीण शमिता शेट्टी हिला एका चित्रपटात कास्ट करण्याचा विचार करत होता. या प्रकरणात गहना वशिष्ठ हिलादेखील अटक करण्यात आली आहे. सदर प्रकरणात राज कुंद्रा याला 19 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. तब्येतीच्या काही कारणांमुळे गहना सध्या जामिनावर सुटली आहे.

एनबीटीला दिलेल्या मुलाखतीत गहाना वशिष्ठ म्हणाली की, ‘राज कुंद्राच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याच्या कार्यालयात गेले होते. तेथे मला कळले की, तो बॉलीफेम नावाच्या नव्या अ‍ॅपवर काम करत आहे. या अ‍ॅपसाठी तो रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडिओ, फीचर फिल्म आणि चॅट शोची योजना करत होता. फीचर फिल्ममध्ये बोल्ड सीन्स टाकण्याची कोणतीही योजना नव्हती.’

शमिता शेट्टीच्या नावाचा विचार

गहना वशिष्ठ पुढे म्हणाली की, ‘आम्ही पटकथांवरही चर्चा केली. त्यानंतर आम्ही शमिता शेट्टीला स्क्रिप्टसाठी कास्ट करण्याचा विचार केला. शमिता शेट्टी व्यतिरिक्त सई ताम्हणकर आणि इतर दोन कलाकारांच्या नावांचा विचार केला जात होता. मला कदाचित हे चित्रपट दिग्दर्शित करावे लागणार होते. राज कुंद्राच्या अटकेच्या काही दिवस आधी मी त्याबद्दल विचार करत होते.’

यासोबत गहनाने असेही म्हटले आहे की, ती शमिताला कधी भेटली नाही. शमिता शेट्टीची फी आणि तिच्या मागण्यांविषयी तिला काही माहिती नव्हते. तिला फक्त इतकेच माहित होते की, तिला चित्रपटाचे दिग्दर्शन करावे लागेल.

19 जुलै रोजी राज कुंद्राला अश्लील चित्रपट प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने अटक केली होती. कोर्टाने त्याला आज म्हणजे 23 जुलैपर्यंत रिमांडवर पाठवले आहे. राज कुंद्राच्या अटकेनंतर गहनाने तिची प्रतिक्रिया दिली. व्हिडीओ शेअर करताना गहनाने म्हटले होते की, ज्या आरोपांमुळे अटक झाली आहे ते आरोप निराधार आहेत. अश्लील आणि कामुक चित्रपटांचा अर्थ लोकांना समजला पाहिजे. येथे कोणीही अश्लील चित्रपट बनवत नव्हते.

(Gehana vasisth reveals that Raj Kundra is working on Bollyfame new app to feature Shamita Shetty)

हेही वाचा :

राज कुंद्रावर नग्न ऑडिशनची मागणी केल्याचा आरोप, आता बलात्काराच्या धमक्या मिळत असल्याचा अभिनेत्रीचा दावा

Shilpa Shetty’s First Reaction | पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीची पहिली प्रतिक्रिया, व्यक्त केल्या मनातील भावना

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI