Happy Birthday Armaan Malik | आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा अरमान मलिक ‘सारेगमप’चा विजेताही!

Happy Birthday Armaan Malik | आपल्या गोड आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारा अरमान मलिक ‘सारेगमप’चा विजेताही!
अरमान मलिक

अरमान मलिक (Armaan Malik) बॉलिवूडमधील एक उत्तम गायक आहे. आपल्या आवाजाने रसिकांना भुरळ घालणाऱ्या गायक आणि संगीतकार अरमान मलिक याचा आज वाढदिवस आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Harshada Bhirvandekar

Jul 22, 2021 | 11:10 AM

मुंबई : अरमान मलिक (Armaan Malik) बॉलिवूडमधील एक उत्तम गायक आहे. आपल्या आवाजाने रसिकांना भुरळ घालणाऱ्या गायक आणि संगीतकार अरमान मलिक याचा आज वाढदिवस आहे. अरमान मलिक य093Eचा जन्म 22 जुलै 1995 रोजी मुंबई येथे झाला होता. अरमान मलिक याला संगीताचा कौटुंबिक वारसा मिळाला आहे. वास्तविक अरमान मलिक हा प्रसिद्ध संगीतकार सरदार मलिक याचा नातू आणि गायक अनु मलिक यांचा पुतण्या आहे.

आजमितीला हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि संगीत क्षेत्रातील अरमान हा एक अत्यंत उदयोन्मुख संगीतकार आहे. अरमान हा संगीतकार डबू मलिक यांचा मुलगा आहे. आज (22 जुलै), अरमानच्या वाढदिवसा निमित्ताने आपण त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत, ज्या कदाचित तुम्हाला माहितीही नसतील.

अरमानच्या कारकीर्दीची सुरुवात

अरमान मलिक याने बाल कलाकार म्हणून आपल्या संगीत कारकिर्दीची सुरुवात ‘भूतनाथ’ चित्रपटातील ‘मेरे बडी’ या गाण्यापासून केली. यानंतर अरमानने आयुष्यात मागे वळून पाहिले नाही. सर्वांचा लाडका गायक असणारा अरमान 2005मध्ये ‘सारेगमप लिटील चँप’चा विजेता ठरला होता. अरमानने लहान वयात बर्‍याच जाहिरातींसाठी जिंगल्सही गायल्या होत्या.

अरमानला मिळाले यश

अरमानच्या सुरुवातीपासूनच यश मिळू लागले. अरमान हा बॉलीवूडचा सर्वात तरुण प्लेबॅक सिंगर आहे ज्याने लंडनच्या वेम्बली थिएटरमध्ये सादरीकरण केले आहे. अरमानने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत वेगवेगळ्या भाषांमध्ये गाणी गायली आहेत. अरमान मलिक अवघ्या नऊ वर्षापासून तेलगू, कन्नड, बंगाली, गुजराती, मराठी आणि इंग्रजी भाषांमध्ये गाणी गातो, हे जाणून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटेल. इतकेच नाही तर अरमानने अनु मलिक आणि जूही परमार यांच्यासमवेत लिटल स्टार अंताक्षरी देखील होस्ट केले आहे.

पहिला सिंगल अल्बम

जेव्हा अरमान मलिकचा पहिला सिंगल अल्बम आला, तेव्हा तो अवघ्या 18 वर्षाचा होता. त्याचा पहिला अल्बम ‘अरमान’ होता, जो त्याचा मोठा भाऊ अमल मलिक याने तयार केला होता. अरमानने संगीतातही शिक्षण घेतले आहे.

हिरोचा आवाज केला डब

अरमान मलिकने शाहरुख खान आणि काजोल स्टारर फिल्म ‘माय नेम इज खान’ मध्येही आवाज दिला होता. अरमानने या चित्रपटात एका इंग्रज मुलाची व्यक्तिरेखा डब केली होती.

(Happy Birthday Armaan Malik some unknown things about Singer)

हेही वाचा :

Umesh Kamat | राज कुंद्रा प्रकरणातील आरोपी म्हणून फोटो, अभिनेता उमेश कामतकडून कारवाईचा इशारा

Luxurious Bungalow | अतिशय आलिशान आणि भव्य शिल्पा शेट्टी-राज कुंद्रा यांचे घर, पाहा फोटो

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें