Happy Birthday Mala Sinha | कधीकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करायच्या माला सिन्हा, आता मनोरंजन विश्वापासून राहतायत दूर!

अभिनेत्री आल्डा सिन्हा बद्दल बोलायचे झाले तर, या नावाने अभिनेत्री लगेच ओळखता येत नाही. पण, याऐवजी माला सिन्हा (Mala Sinha) यांचे नाव घेतल्यावर त्यांचे अनेक चित्रपट डोळ्यासमोर येतात. होय, माला सिन्हा यांचे खरे नाव आल्डा आहे.

Happy Birthday Mala Sinha | कधीकाळी चित्रपटसृष्टीवर राज्य करायच्या माला सिन्हा, आता मनोरंजन विश्वापासून राहतायत दूर!
Mala Sinha
Follow us
| Updated on: Nov 11, 2021 | 7:31 AM

मुंबई : अभिनेत्री आल्डा सिन्हा बद्दल बोलायचे झाले तर, या नावाने अभिनेत्री लगेच ओळखता येत नाही. पण, याऐवजी माला सिन्हा (Mala Sinha) यांचे नाव घेतल्यावर त्यांचे अनेक चित्रपट डोळ्यासमोर येतात. होय, माला सिन्हा यांचे खरे नाव आल्डा आहे. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1936 रोजी कोलकाता (तेव्हाचा कलकत्ता) येथे झाला. हिंदी व्यतिरिक्त त्यांनी बंगाली आणि नेपाळी भाषांमध्येही अनेक चित्रपट केले आहेत. माला सिन्हा 50, 60 आणि 70च्या दशकातील हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. त्यांनी जवळपास चार दशके चित्रपटांमध्ये काम केले.

माला सिन्हा शाळेत जायच्या तेव्हा त्यांच्या मैत्रिणी त्यांना मस्करीत ‘डालडा’ म्हणत असता. त्याचवेळी मालाचे आई-वडील तिला ‘बेबी’ म्हणायचे, त्यामुळे अनेक मित्र तिला डालडा सिन्हा आणि अनेक बेबी सिन्हा म्हणू लागले. चित्रपटात काम करण्यापूर्वी त्या रेडिओसाठी गाणी गायच्या. माला दिसायला खूप सुंदर होत्या, म्हणून कोणीतरी त्यांना चित्रपटात काम करण्याचा सल्ला दिला. चित्रपटात काम करण्याचे स्वप्न घेऊन त्या मुंबईत आल्या, पण इथे त्यांना खूप संघर्ष करावा लागला.

आई नेपाळी, तर वडील बंगाली!

मालाचे वडील अल्बर्ट सिन्हा हे मुळचे बंगालचे होते. तर त्यांची आई नेपाळची होती. त्यामुळे लोक त्यांना नेपाळी-भारतीय बाला म्हणत. एकदा माला सिंह एका निर्मात्याकडे गेल्या तेव्हा निर्मात्याने त्यांना सांगितले की, आधी आरशात बघ आणि तुझा चेहरा बघ, एवढ्या वाईट नाकाने हिरोईन बनण्याचे स्वप्न बघतेयस, अस म्हणत त्यांना काम नाकारलं होतं.

एका बंगाली चित्रपटाच्या निमित्ताने माला सिन्हा मुंबईत आल्या होत्या. येथे त्यांची भेट त्यांच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री गीता बाली यांच्याशी झाली. त्यांनी माला याची दिग्दर्शक केदार शर्माशी ओळख करून दिली. मालाचं करिअर पुढे नेण्यात केदार शर्मा यांची खूप मदत झाली असं म्हटलं जातं. ‘रंगीन राते’  या चित्रपटातून माला सिन्हा यांनी अभिनेत्री म्हणून पदार्पण केले.

माला सिन्हा यांचे गाजलेले चित्रपट

गुरु दत्त दिग्दर्शित 1957 मध्ये आलेल्या ‘प्यासा’ चित्रपटाची पटकथा सर्वप्रथम मधुबालासाठी लिहिली गेली होती. ‘मधुबाला’ हा चित्रपट करू शकली नाही आणि माला सिन्हा यांना त्यात काम मिळाले. ‘प्यासा’ने माला सिन्हा यांच्यासाठी चित्रपट क्षेत्राचे मार्ग खुले केले. यानंतर त्यांनी ‘धूल का फूल’, ‘फिर सुबह होगी’, ‘हरियाली और रास्ता’, ‘अनपढ’, ‘दिल तेरा दिवाना’, ‘गुमराह बहुरानी, ‘​​जहांआरा’, ‘हिमालय की गोद में’, ‘आँखे’, ‘दो कलियां’ आणि ‘मरियम’ यासह अनेक चित्रपट केले.

अभिनेत्रींवरची कमेंट ठरली वादग्रस्त

एकदा माला सिन्हा यांनी अभिनेत्री झीनत अमान आणि परवीन बाबी यांच्यावर अशी कमेंट केली होती, जी ऐकून दोन्ही अभिनेत्री संतापल्या. माला सिन्हा त्यांना पाहून म्हणाल्या होत्या की, या अभिनेत्री कमी आणि मॉडेल जास्त आहेत. मॉडेलकडे दाखवण्यासाठी फक्त शरीर आहे.

माला सिन्हा यांना प्रतिभा सिन्हा ही मुलगी आहे. प्रतिभाने बॉलीवूडमध्ये मोठ्या धूमधडाक्यात प्रवेश केला. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटात त्यांच्यावर चित्रित केलेले ‘परदेसी परदेसी’ हे गाणे आजही लोकांना आठवते. मात्र, प्रतिभाच्या कारकिर्दीत फारशी प्रगती झाली नाही. माला सिन्हा आता सार्वजनिक ठिकाणी फारच क्वचितच दिसतात. 1994 मध्ये त्यांनी ‘जिद’ हा शेवटचा चित्रपट केला होता.

हेही वाचा :

गोल्डन शिमरी ड्रेसमध्ये खुललं अप्सरेचं सौंदर्य, पाहा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं नवं फोटोशूट!

मराठी चित्रपटांची मांदियाळी, हास्याची मेजवानी घेऊन येणारा ‘इमेल फिमेल’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.