AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Happy Birthday Rajkummar Rao | कधी ‘विक्की’ तर कधी ‘न्यूटन’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, ‘या’ चित्रपटाने मिळवून दिली राजकुमार रावला ओळख!

31 ऑगस्ट 1984 रोजी हरियाणातील गुडगाव येथे जन्मलेल्या राजकुमार राव (Rajkummar Rao) याला आजमितीला बॉलिवूडमध्ये कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. काहीतरी बनण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन मुंबईत आलेल्या राजकुमारने कठोर संघर्ष करून हे स्थान मिळवले आहे.

Happy Birthday Rajkummar Rao | कधी ‘विक्की’ तर कधी ‘न्यूटन’ प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं, ‘या’ चित्रपटाने मिळवून दिली राजकुमार रावला ओळख!
राजकुमार राव
| Edited By: | Updated on: Aug 31, 2021 | 7:31 AM
Share

मुंबई : 31 ऑगस्ट 1984 रोजी हरियाणातील गुडगाव येथे जन्मलेल्या राजकुमार राव (Rajkummar Rao) याला आजमितीला बॉलिवूडमध्ये कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. काहीतरी बनण्याचे स्वप्न डोळ्यात घेऊन मुंबईत आलेल्या राजकुमारने कठोर संघर्ष करून हे स्थान मिळवले आहे. राजकुमार राव मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, त्यांचे संपूर्ण कुटुंब चित्रपटांचे शौकीन आहे. कदाचित हेच कारण होते की, लहानपणापासूनच त्याला चित्रपटांमध्ये झळकण्याची आवड निर्माण झाली होती. त्यानी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले आणि नंतर पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून प्रशिक्षण घेतले आणि नंतर तो मुंबईला रवाना झाला.

मात्र, मुंबईत आल्यानंतर राजकुमार राव याला बराच काळ संघर्ष करावा लागला. शेकडो ऑडिशन्स दिल्या, रांगेत उभा राहिला, खूप प्रयत्न केले आणि नंतर ‘लव सेक्स और धोका’ या चित्रपटात त्याची वर्णी लागली. 2010 मध्ये आलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले होते. यानंतर राजकुमार राव ‘रागिनी एमएमएस 2’, ‘गँग्स ऑफ वासेपूर भाग 2’ सारख्या अनेक चित्रपटांत सहाय्यक भूमिकांमध्ये दिसला. राजकुमार राव याला ‘काई पो चे’ या चित्रपटातून खरी ओळख मिळाली. या चित्रपटात त्याच्यासोबत सुशांत सिंह राजपूतही मुख्य भूमिकेत होता.

राजकुमारच्या यशात दिग्दर्शकांचा मोठा वाटा

राजकुमार राव याला यशाच्या शिडीवर नेण्यात अनेक दिग्दर्शकांचाही मोलाचा वाटा आहे. राजकुमार राव याच्या ‘न्यूटन’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित मसूरकर यांनी सांगितले होते की, ‘राजकुमार जबरदस्त अॅक्शन सीन्स करतो. जेव्हा आम्ही न्यूटन चित्रपट करत होतो, तेव्हा कळले की राजकुमार राव हा मार्शल आर्टमध्ये ब्लॅक बेल्ट आहेत. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारले, तेव्हा तो म्हणाला की, त्याला बऱ्याचदा अशा चित्रपटांमध्ये कास्ट केले जाते जिथे जास्त अॅक्शन नसते आणि पात्र गंभीर असते, त्याचे अॅक्शन सीन्स पाहून मी प्रभावित झालो.’ या चित्रपटाने राजकुमार राव याला एक प्रतिभावान अभिनेता म्हणून स्थापित केले आणि त्याला या चित्रपटासाठी प्रचंड प्रशंसा मिळाली.

व्यक्तिरेखेच्या अभ्यासाठी काहीही!

त्याचा ‘मेड इन चायना’ हा चित्रपट पडद्यावर फारशी जादू दाखवू शकला नाही, पण चित्रपटाचे दिग्दर्शक मिखिल मुसळे देखील राजकुमारच्या कामामुळे प्रभावित झाले. या चित्रपटासाठी राजकुमार अहमदाबादला गेला होता. तो अहमदाबादला गेला कारण या चित्रपटात त्याचे पात्र गुजराती व्यावसायिकाचे होते आणि तो त्या भूमिकेत उतरण्यासाठी तिथे पोहोचला होता. तो नेहमीच त्याच्या भूमिकेचा अभ्यास करतो आणि पात्र जिवंत करण्यासाठी खूप मेहनत घेतो. राजकुमारचा चित्रपट हिट झाला नसला, तरी त्याच्या व्यक्तिरेखेचे ​​खूप कौतुक झाले.

‘स्त्री’ हा राजकुमार रावच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा हिट चित्रपट आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि पंकज त्रिपाठी यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. राजकुमार राव हा एक असा व्यक्ती आहे, जो प्रेक्षकांना आवडणाऱ्या गोष्टी समजून घेतो. या चित्रपटाच्या सेटवर सुद्धा तो खूप मजा करायचा. त्याला पाहून असे वाटले नाही की, त्यानेही इतके गंभीर पात्र साकारले आहे. तो त्याच्या पात्रामध्ये इतका तल्लीन व्हायचा की, प्रत्येकजण त्याला विक्की म्हणत असत. त्याला फक्त त्याचे संवादच आठवत नव्हते, तर तो इतरांचे संवादही पाठ करत असे, जेणेकरून कोणी विसरले तर त्याच्या ते लक्षात आणून देता येईल.

स्वतःला सिद्ध करायचेय!

राजकुमार रावने मोठे होण्याचे आणि यशस्वी होण्याचे स्वप्न पाहिले होते, ते पूर्ण देखील केले. पण आता त्याला त्याच्या आत दडलेली प्रतिभा बाहेर आणायची आहे. तो कॉमेडी, हॉरर अॅक्शन आणि सर्व प्रकारचे गंभीर विषय खूप चांगल्या प्रकारे हाताळतो. राजकुमार फिल्म आणि 90च्या दशकातील गाण्यांचा शौकीन आहे. राजकुमार राव ‘बरेली की बर्फी’, ‘न्यूटन’, ‘शादी में जरूर आना’, ‘स्त्री’ सारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये झळकला आहे.

हेही वाचा :

Hina Khan : अभिनेत्री हीना खानचा ग्लॅमरस अवतार, हे फोटो पाहाच

सोनम कपूरला मोठा धक्का, संजय लीला भन्साळींच्या आगामी चित्रपटातून दाखवला बाहेरचा रस्ता?

सौंदर्यातही बॉलिवूड अभिनेत्रींशी टक्कर, अक्षरा सिंहची ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये धमाल

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.