Aamir Khan Kiran Rao Divorce: आमिर खान- प्रेम, घटस्फोट, प्रेम आणि तीन मुलांचा बाप, काय काय घडलं स्टारच्या आयुष्यात? वाचा सविस्तर!

पहिलं प्रेम... त्यानंतर लग्न... दोन मुलं... नंतर घटस्फोट... पुन्हा दुसरं प्रेम... लग्न, एक मुलगा आणि पुन्हा घटस्फोट... 'मिस्टर परफेक्शनिस्ट' तरीही आमिर खानचं आयुष्य असं विस्कळीत झालं आहे. (Amir Khan Divorce)

Aamir Khan Kiran Rao Divorce: आमिर खान- प्रेम, घटस्फोट, प्रेम आणि तीन मुलांचा बाप, काय काय घडलं स्टारच्या आयुष्यात? वाचा सविस्तर!
Aamir Khan
Follow us
| Updated on: Jul 03, 2021 | 2:00 PM

मुंबई: पहिलं प्रेम… त्यानंतर लग्न… दोन मुलं… नंतर घटस्फोट… पुन्हा दुसरं प्रेम… लग्न, एक मुलगा आणि पुन्हा घटस्फोट… ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ तरीही आमिर खानचं आयुष्य असं विस्कळीत झालं आहे. बॉलिवूडचा स्टार असलेल्या आमिरच्या आयुष्यात बरंच काही घडलं. सार्वजनिक आयुष्यात अनेक वादांना त्याला जसं सामोरे जावं लागलं, तसंच त्याला वैयक्तिक आयुष्यातही वादळांचा सामना करावा लागलाय. आमिरच्या पहिल्या लग्नापासून ते दुसऱ्या घटस्फोटापर्यंतच्या अनेक गोष्टींवर टाकलेला हा प्रकाश. (Here’s Everything You Need To Know About Aamir Khan)

पहिलं प्रेम, पळून जाऊन लग्न

आमिर खानचं पहिलं प्रेम रीना दत्तावर जडलं होतं. आमिर आणि रीनाच्या घराच्या खिडक्या एकमेकांच्या समोरासमोर होत्या. ते दोघं नेहमीच एकमेकांना पाहात असायचे. आमिर रीनाच्या प्रेमात पडला होता. त्याने तिला प्रपोजही केले होतं. मात्र रीनाने नेहमीच त्याला नकार दिला. विशेष म्हणजे आमिरने रीनाला एकदा रक्ताने पत्रही लिहिलं होतं. मात्र त्यानंतरही रीनाने त्याचे न ऐकताच तू असं करु नकोस असे सांगितले. यानंतर आमिरने तिच्या मागे मागे करणं बंद केले. पण यानंतर रीना आमिरच्या प्रेमात पडली. आमिरच्या 21 व्या वाढदिवसाच्या दिवशी दोघांनी घरातून पळून जाऊन रजिस्ट्रार ऑफिसमध्ये लग्न केले होतं. आमिरला पहिली पत्नी रीया दत्तापासून आयरा खान आणि जुनैद खान अशी दोन मुलं आहेत.

16 वर्षानंतर विभक्त

लग्नानंतर तब्बल 16 वर्षांनी म्हणजेच 2002 मध्ये रीना आणि आमिर दोघे वेगळे झाले. त्यांनी घटस्फोट का घेतला, त्याचे नेमके कारण काय? याची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर ते एकमेकांविषयी काहीही बोलले नाहीत. “कायदेशीररित्या आम्ही वेगळे झालो असलो तरी एक कागदाचा तुकडा आमच्यातील नातं संपवू शकत नाही,” असे आमिर घटस्फोटानंतर म्हणाले होता. या घटस्फोटानंतर तीन वर्षांनी म्हणजे 2005 मध्ये आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. त्या दोघांना आझाद नावाचा एक मुलगा आहे.

दुसऱ्या प्रेमाची पहिली भेट

आमिर आणि किरण रावची पहिली भेट ‘लगान’च्या सेटवर झाली होती. स्वत: आमिरनेच त्याचा खुलासा एका मुलाखतीत केला होता. त्यावेळी किरण माझ्यासाठी फक्त माझी टीम सदस्य होती. ती असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होती. रीनाला (पहिली पत्नी) घटस्फोट दिल्यानंतर मी किरणला भेटलो. त्यावेळी आमची खास बातचीत झाली नाही. त्यावेळी ती माझी मैत्रीणही नव्हती, असं आमिरने सांगितलं होतं.

फोन कॉलने नातं जुळलं

आमिर नुसताच मिस्टर परफेक्शनिस्ट नाही तर तो बुद्धिमान अभिनेता आहे. किरणही बुद्धिमान दिग्दर्शिका आहे. किरणच्या बुद्धिमतेवरच प्रभावीत झाल्याचंही त्याने कबुल केलं होतं. रीनाशी घटस्फोट घेतल्यानंतर मी मानसिक तणावात होतो. तेव्हा एकदा किरणने मला फोन केला होता. आम्ही फोनवर किमान 30 मिनिटं म्हणजे अर्धातास बोलत होतो. किरणच्या बोलण्यावर मी प्रभावित झालो. त्यानंतर मी किरणला डेट करण्यास सुरुवात केली. दोन वर्षे आम्ही एकमेकांना भेटत होतो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला, असं त्याने सांगितलं होतं. किरणशिवाय आयुष्य हा विचारच मी करू शकत नाही, असंही तो म्हणाला होता. 2005मध्ये या दोघांचं लग्न झालं होतं. आता या दोघांनीही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे.

दुसऱ्यांदा घटस्फोट

आमिर आणिकिरण राव या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आमिर आणि किरण रावने संयुक्त निवेदन जारी करुन या निर्णयाविषयी माहिती दिली. आमिर -किरण रावच्या घटस्फोटाच्या वृत्ताने बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दोघांनी सहमतीने वेगळे होत असल्याचं म्हटलं आहे. “गेल्या 15 वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू,” असे या निवेदनात म्हटले आहे. (Here’s Everything You Need To Know About Aamir Khan)

संबंधित बातम्या:

Aamir Khan Kiran Rao Divorce: घटस्फोट शेवट नव्हे, नवी सुरुवात, आमिर खान-किरण रावचं पत्र जसंच्या तसं!

Amir Khan Kiran Rao Divorce: हा शेवट नव्हे तर सुरुवात; आमिर खान-किरण रावच्या मुलाचा ताबा आता कोणाकडे?

20 years of Lagaan | पहिल्या पत्नीचं ‘ते’ पत्र वाचून ढसाढसा रडला आमीर खान, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

(Here’s Everything You Need To Know About Aamir Khan)

Non Stop LIVE Update
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.