AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्रदयस्पर्शी! आर्यनला हवं तर विसरा, पण ह्रतिक रोशनची एक पोस्ट जी प्रत्येक तरुणानं वाचावी!

अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आर्यनसाठी एक प्रेमाचा सल्ला शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्याने आर्यनचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याच्यासाठी एक लांब संदेश लिहित शाहरुखच्या 23 वर्षीय मुलाला शांत राहण्यास आणि या क्षणी अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीचे मालक होऊन जबाबदारी घेण्यास सांगितले आहे.

ह्रदयस्पर्शी! आर्यनला हवं तर विसरा, पण ह्रतिक रोशनची एक पोस्ट जी प्रत्येक तरुणानं वाचावी!
Hritik-shahrukh-aryan
| Edited By: | Updated on: Oct 07, 2021 | 1:19 PM
Share

मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) आज (7 ऑक्टोबर) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. कारण, त्याला नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) ड्रग्सच्या प्रकरणात अटक केली होती. यावर पुढील सुनावणी होण्याआधी अभिनेता हृतिक रोशनने (Hrithik Roshan) आर्यनसाठी एक प्रेमाचा सल्ला शेअर करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्याने आर्यनचा एक फोटो पोस्ट केला आणि त्याच्यासाठी एक लांब संदेश लिहित शाहरुखच्या 23 वर्षीय मुलाला शांत राहण्यास आणि या क्षणी अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीचे मालक होऊन जबाबदारी घेण्यास सांगितले आहे. आर्यनने आव्हानांना स्वीकारावे आणि त्याने पुढे एक चांगला माणूस व्हावे, अशी त्याची इच्छा आहे.

अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे.

काय म्हणाला हृतिक रोशन?

“माझ्या प्रिय आर्यन, जीवन एक विचित्र राईड आहे. हे उत्तम आहे, कारण ते अनिश्चित आहे. हे खूप मोठे कारण आहे की, ते तुम्हाला कर्व्हबॉल प्रमाणे फेकते. पण देव दयाळू आहे. तो फक्त सर्वात लढाऊ व्यक्तींना खेळण्यासाठी सर्वात कठीण चेंडू देतो. तुम्हाला माहित आहे की, जेव्हा तुम्ही निवडले जातात तेव्हा या गोंधळात तुम्हाला तुमच्या स्वतःवर नियंत्रण ठेवताना दबाव जाणवू शकतो. आणि मला माहित आहे की, तुम्हाला ते आता वाटले पाहिजे. राग, गोंधळ, असहायता. आहा, हिरोला आतून बाहेर काढण्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण सावध रहा, तेच घटक चांगल्या गोष्टींना जाळून देखील टाकू शकतात… दयाळूपणा, करुणा, प्रेम,’ असे हृतिकने लिहिले.

तो पुढे म्हणाला, ‘स्वतःला जाळण्याची परवानगी द्या, पण फक्त पुरेशी.. चुका, अपयश, विजय, यश… ते सर्व समान आहेत जर तुम्हाला माहित असेल की, कोणते भाग तुमच्याकडे ठेवावेत आणि कोणते भाग अनुभव घेऊन दूर फेकून द्यावेत. पण हे जाणून घ्या की, तुम्ही त्या सर्वांसोबत चांगले वाढू शकता… मी तुला एक लहान मुलगा म्हणूनही पाहिले आहे आणि आता एक चांगल अमानुस म्हणूनही पहिले आहे. जर तू या सगळ्या गोष्टी चाल्याप्र्कारे जोडल्यास तर एक उत्तम माणूस बनशील.. नेहमी शांत राहा. निरीक्षण करा. हे क्षण तुझाय्साठी महत्त्वाचे आहेत, तुझे निर्माते आहेत. आणि स्वतःवर विश्वास ठेव, आम्ही नेहमी तुझ्यासोबत आहोत..’

पाहा पोस्ट :

हेही वाचा :

संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?

शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.